प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट अवघ्या 9 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. इतक्या छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: कमाईचा पूर आणला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 600 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. प्रदर्शनाला महिना उलटूनही हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये दमदार कमाई करत आहे.