Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend: ‘मेलोडी खाओ सब जान जाओ’ सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचा मेलोनी ट्रेंड व्हायरल; चाहते म्हणाले..


Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या  लव्हस्टोरीमुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघांचे रोमँटिक आणि मजेशीर व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आता या कपलने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘मेलोडी’ ट्रेंडला फॉलो करत एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचा मेलोनी ट्रेंड 

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘मेलोडी’ हा हॅशटॅग मोदी आणि मेलोनी यांच्या नावांपासून तयार झाला आहे. दोघांचे फोटो किंवा व्हिडीओ समोर आले की हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतो. 20 मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ टॉफी गिफ्ट केल्याचा व्हिडीओ समोर आला आणि त्यानंतर हा ट्रेंड आणखी चर्चेत आला.याच ट्रेंडवर आधारित सोनाक्षी आणि जहीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

सुरुवातीला ती व्हिडिओमध्ये एकटीच दिसते, पण नंतर जहीर इक्बाल मागून येतो आणि सोनाक्षी सिन्हाला विचारतो की, तो, जहीर इक्बाल, तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला माहीत आहे का? त्यावर सोनाक्षी म्हणते, “नाही, तूच सांग.” त्यानंतर जहीर खिशातून ‘मेलोडी’ टॉफी काढून तिला देतो आणि म्हणतो, “ही मेलोडी खा, तुलाच समजेल.”

नेहमीप्रमाणेच या दोघांचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कमेंट्समध्ये जहीरच्या ह्यूमरचंही कौतुक केलं आहे. दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2024 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांना काही प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं.

 

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *