Shani Dev Favourits Zodiac Signs : 12 पैकी ‘या’ 4 राशींवर असते शनिदेवाची कृपा; मेहनत आणि प्रामाणिकपणाने हमखास जग जिंकतात, तुमची रास यात आहे?


Shani Dev Favourits Zodiac Signs : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच, न्यायदेवता म्हणतात. शनिला धैर्य, मेहनत आणि शिस्तीचा कारक ग्रह मानतात. त्यामुळेच शनिच्या प्रिय राशींमध्ये हे गुण हमखास पाहायला मिळतीत. ज्योतिष शास्त्रानुसार, 12 पैकी 4 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. या राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. शनि देव तूळ राशीच्या उच्च स्थानी आहेत. या राशीचे लोक फार बुद्धिमानी आणि मेहनती स्वभावाचे असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करतात. तसेच, यांची आर्थिक स्थितीही चांगली असते. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीचा स्वामी ग्रह स्वत: शनिदेव आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो. तसेच, या राशीचे लोक फार मेहनती आणि शिस्तप्रिय स्वभावाचे असतात. करिअरच्या बाबतीत हे लोक जराही तडजोड करत नाहीत. तसेच, कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ रास ही शनिची प्रिय रास मानली जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेव रक्षकासारखं काम करतात. या राशीचे लोक फार बुद्धीमानी, प्रामाणिक आणि वक्तशिर स्वभावाचे असतात. या स्वभावामुळेच ते समाजात मान-सन्मान प्राप्त करतात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीचा स्वामी ग्रह खरंतर शुक्र आहे. मात्र, शनिबरोबर शुक्राचं मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे या राशीवर देखील शनिदेवाचा वरदहस्त असतो. या राशीचे लोक पार शांत, व्यावहारिक, विश्वासू आणि आपल्या ध्येयावर फोकस करणारे असतात. या राशीचे लोक फार भाग्यवान असतात. कारण यांच्यावर दोन ग्रहांचा वरदहस्त असतो. शुक्र ग्रहामुळे धनसंपत्तीत चांगली भरभराट होते. तसेच, या राशीचे लोक दिसायलाही फार सुंदर असतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                  

Numerology : Logic आणि Ego चं कॉम्बिनेशन असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक; बोलण्यात एकदम पटाईत, कधीच हार मानत नाहीत

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *