Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’मध्ये शरद पवारांची एन्ट्री, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार, तर राडा घालण्याचा राऊतांचा निर्धार


Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठकच खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठरणार आहे. आज सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. शिंदेंसोबत सहा खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका ठरणार आहे. सहापैकी 2 खासदारांनी आपली आश्वासन पूर्ण झाली नाहीत त्यामुळे सहीच केली नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झालं की नाही? हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही.

ठाकरेंच्या खासदारांच्या या बैठकीआधी संजय राऊत (Sanjay Raut) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात सुरु असलेल्या घडमोडींवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. शरद पवार तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल, अशी माहिती अरविंद सावंत आणि संजय राऊतांनी दिली. त्यामुळे आता ऑपरेशन टायगरमध्ये शरद पवारांची एन्ट्री झाल्याचं बोललं जात आहे. 

फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा अॅक्शन प्लॅन ठरला- (Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray)

वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो, असंही अरविंद सांवत म्हणाले. व्हीपला झुगारून अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाई पक्षप्रमुख करतील. त्यांनी प्रतारणा केली तर पुढल्या कारवाईसंदर्भात पक्षप्रमुखांशीच चर्चा होईल, असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. 

ऑपरेशन टायगर फुलप्रूफ- (Shivsena Opration Tiger)

ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) फुलप्रूफ झालेले असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. रात्रभरात दिल्लीत वायूवेगानं घडामोडी घडत गेल्या. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करुन आपली बाजू मांडतील, असं सांगण्यात येत आहे.

‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Opration Tiger)

  • 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
  • अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
  • 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
  • 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
  • 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
  • अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
  • नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित 
  • ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर 
  • 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट 
  • 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
  • फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र 
  • 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद 
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र 
  • ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप 

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Opration Tiger Shivsena MP)

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

संजय राऊत आणि अरविंद सावंत काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटीलसह 6 खासदारांना एकत्र कॉलवर घेतलं; ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं सांगत म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *