Pune Court Mandar Kiwale: अवघ्या अर्ध्या गुंठ्यावरून गँगवॉर, पुणे गोळीबार प्रकरणात मोठी माहिती, किवळे-चव्हाण यांच्यातील वाद तरी काय? – Marathi News | Pune Shivajinagar Court Case update Katraj half guntha plot dispute rivalry Mandar Kiwale Shubham Chavan gangwar


अवघ्या अर्ध्या गुंठ्यावरून गँगवॉर, किवळे-चव्हाण यांच्यातील वाद तरी काय?

Mandar Kiwale Shubham Chava Pune: पुण्यात शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात आरोपी मंदार किवळे याच्यावर दुसऱ्या टोळीने गोळीबार केला आणि कोयत्याने वार केले. हे दृश्य पाहून पुणेच नाही तर राज्य हादरले. याप्रकरणी एकूण 9 आरोपींपैकी 8 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या रक्तरंजित थरारामागे जागेचा वाद असल्याची माहिती समोर येत आहे. दोन गुंठ्यांचा भूखंड आणि त्यातील अर्ध्या गुंठ्यावरून एकाचा जीव गेला आहे. तर आता एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. किवळे-चव्हाण यांच्यातील जागेचा वाद तरी काय?

अवघ्या अर्धा गुंठा जागेवरून गँगवार

कात्रजमधील संतोषननगरमधील दोन गुंठ्यांचा भुखंड आहे. त्यातील अर्ध्या गुंठा जागेच्या मालकीवरून गँगवॉर सुरू झाले. एका बाजूला शुभम चव्हाण आणि त्याची टोळी तर दुसऱ्या बाजूला मंदार किवळे आणि त्यांची गँग असा सामना झाला. अगोदर दोन्ही गटात धुसफूस होती. शुभम चव्हाण हा संतोषनगरमध्येच राहत होता. याच भागत त्याचे एक रेस्टॉरंट होते. घराशेजारील जमिनीवरून शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात वाद होता.

त्यानंतर जागेच्या वादातून 20 एप्रिल 2025 रोजी शुभम चव्हाण याची हत्या झाली. त्याच्यावर दुसऱ्या टोळीने लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी हल्ला चढवला होता. पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करत आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून अटक केली होती. या हत्या प्रकरणात अमर साकोरे, मंदार किवळे, गिरीष वावरे आणि योगेश डोरे या चौघांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शुभम चव्हाण याचा भाऊन आणि मित्रांनी या हत्येचा बदल घेण्याचे ठरवले होते. प्रकरणात आरोपी मंदार किवळे बाहेर येताच त्याच्यावर जबरी हल्ला करण्यात आला.

16 आरोपी रडारवर, 8 जण अटकेत

या प्रकरणात एकूण 16 आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. पुणे गुन्हे शाखेने आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. तर त्यातील दोघांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारं हस्तगत करायची आहे. या हल्ल्याचे मुख्य कारण जमिनीचा वाद आहे. त्याबाबत तपास करायचा आहे, अशी बाजू सरकारी पक्षाने मांडली. न्यायालायने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 2 डिसेंबरला आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.

याप्रकरणात न्यायालय परिसरातच पाळत ठेवत आरोपींनी मंदार किवळे याच्यावर हल्ला केला. अगोदर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. नेम चुकल्यावर त्याचा पाठलाग करण्यात आला. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यात मंदारचे दोन्ही हात तुटल्याचे समजते. सध्या गंभीर जखमी झालेल्या किवळेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *