Shani Sade Sati : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि देव (Lord Shani) जेव्हा पण आपली रास बदलतात तेव्हा काही राशींवर शनिची ढैय्या सुरु होते तर काही राशींवर शनिची साडेसाती सुरु होते. तसेच, काही राशींच्या लोकांची साडेसातीपासून मुक्ती होते. पुढच्या वर्षी 3 जून 2027 रोजी शनि देव मेष राशीत प्रवेश करणार आहे. शनिच्या राशीत होणारा हा बदल दोन राशींच्या जीवनात वादळ निर्माण करणार आहे. कारण या राशींवर शनिच्या ढैय्या सुरु होणार आहे. याचा परिणाम 2027 ते 2030 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या दोन राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
2027 मध्ये ‘या’ 2 राशींवर सुरु होणार शनिची ढैय्या
3 जून 2027 रोजी जेव्हा शनि देव मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा कन्या आणि मकर राशींच्या लोकांवर शनिची ढैय्या सुरु होणार आहे. त्यामुळे 2027 ते 2030 च्या दरम्यान या दोन राशींच्या लोकांना करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.
2027 ते 2030 मध्ये ‘या’ कालावधीत शनि बदलणार चाल
- 3 जून 2027 रोजी शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कन्या आणि मकर राशींवर शनिची ढैय्या असेल.
- 20 ऑक्टोबर 2027 रोजी शनि वक्री चाल चालून पुन्हा मीन राशीत येणार आहे. त्यामुळे कन्या आणि मकर राशींच्या लोकांना काही काळासाठी ढैय्यापासून सुटका मिळेल.
- 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनि देव मार्गी होऊन पुन्हा मेष राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे कन्या आणि मकर राशीला शनिच्या ढैय्याचा धोका असेल.
- 8 ऑगस्ट 2029 रोजी शनि देव मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मकर आणि कन्या राशींना शनिच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल.
- 5 ऑक्टोबर 2029 रोजी शनि आपली चाल बदलून वक्री अवस्थेमुळे मेष राशीत पुन्हा येणार आहे. ज्यामुळे कन्या आणि मकर राशीचे लोक शनिच्या ढैय्याच्या प्रभावात येतील.
- 17 एप्रिल 2030 रोजी शनि देव वृषभ राशीत जाणार आहे. त्यामुळे कन्या आणि मकर राशींच्या लोकांची शनिच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Budh Uday 2026 : अखेर बुध ग्रहाचा उदय! आजपासून 5 राशींच्या धनसंपत्तीत होणार भरभराट; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा लकी राशी