सचिन वाझेला जामीन मंजूर, पुण्यात मुक्काम? तब्बल इतके दिवस तुरुंगात अन् – Marathi News | Major update on the Sachin Vaze case Hearing on the NIA petition


अँटिलिया बॉम्ब प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर झाला. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून आरोपी सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला. 1 लाखांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि त्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर लागणार आहे. सुमारे साडेपाच वर्षांच्या दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर हा जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, या जामिनाला स्थगिती देण्याची NIA ची मागणी आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता या प्रकरणात सुनावणी होणार आहे. जर वाझेला जामीन मंजूर झाला तर त्याला मुंबईसह चार जिल्ह्यात राहता येणार नाही. वाझेचे पुढचे वास्तव्य पुण्यात असणार आहे. वाझेनी पासपोर्ट असल्यास तो NIA कडे जमा करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र, वाझेला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाईपर्यंत मुंबईसह 5 जिल्ह्यांत प्रवेशास बंदी असणार आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत राहण्यासही मनाई करण्यात आली. न्यायालयीन कामकाजासाठीच या जिल्ह्यांत येण्याची परवानगी देण्यात आली. राहत्या ठिकाणाचा पत्ता 7 दिवसांत NIA ला देण्याचे निर्देश आहेत. दर रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यात दुपारी 12 ते 3 दरम्यान हजेरी लावणे बंधनकारक आहे.

साक्षीदारांशी संपर्क न करण्यासह पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. सचिन वाझेने तुरुंगातून लिहिलेले तिसरे पुस्तक प्रकाशित. तुरुंगात सचिन वाझेने लिहिले राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणावर पुस्तक. Lesser Man Bigger Target  सामान्य माणूस मोठे लक्ष्य या नावाचे राजीव गांधी यांच्या अधिरित हे पुस्तक आहे. वाझेचे हे पुस्तक अगदी दोन तीन दिवसापूर्वीच प्रकाशित झाले आहे.

याआधी बीएनएनएस आणि युएपीए कायद्यावर सचिन वाझेने पुस्तक लिहिले आहे. सचिन वाझेंच्या जामिनाविरोधात NIA ची हायकोर्टात धाव घेतली. सचिन वाझेच्या जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करत NIA कडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या प्रकरणातून स्वतःला बाजूला केले. न्यायमूर्ती कोतवाल यांनी रेक्युझ केल्यानंतर NIA ची याचिका आज न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी वाझेंच्या जामीन आदेशाला स्थगिती मिळणार का, याकडे लक्ष.

कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून रिलीज मेमो मिळाला आहे. रिलीज मेमो ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या पेटीत टाकण्यात आला. सकाळी पेटी उघडल्यानंतर हा रिलीज मेमो तुरुंग प्रशासन तपासेल आणि त्यानंतर कारागृहातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सचिन वाझेची सुटका करण्यात येईल. सचिन वाझे दुपारपर्यंत तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता, तत्पूर्वी हायकोर्टाच्या सुनावणीकडेही लक्ष.

हायकोर्टाने सत्र न्यायालयाने दिलेला जामीन आदेश रद्द करावा यासाठी एनआयएने याचिका केली आहे. आज यावर सुनावणी होणार असून हायकोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. सचिन वाझे तुरुंगात गेल्यापासून मोजत होता एकेक दिवस. वाझेचा तुरुंगातील आज 2 हजारवा दिवस आहे. हायकोर्टाने जामिन रद्द न केल्यास आज सचिन वाझे तुरुंगातून सुटेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *