Amitabh Bachchan On Rohit Sharma Wife Ritika Sajdeh: ‘जेव्हा मी रोहित शर्माची मॅच बघतो, तेव्हा माझी नजर त्याच्या बायकोला शोधत असते…’; अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य चर्चेत


Amitabh Bachchan On Rohit Sharma Wife Ritika Sajdeh: बॉलिवूडचे (Bollywood News) बिग बी (Big B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 18’ (Kaun Banega Crorepati 18) या क्विझ शोमध्ये अनेकदा गंमतीशीर गोष्टी घडतात. अलिकडच्याच एका भागात असाच एक प्रसंग घडला. क्विझ शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकानं सांगितलं की, ती क्रिकेटपटू रोहित शर्माची (Rohit Sharma) खूप मोठी फॅन आहे. या संभाषणादरम्यान, ‘बिग बी’ यांनीही कबूल केलं की, त्यांनाही रोहित शर्मा खूप आवडतो. किंबहुना, जेव्हा सामना सुरू असतो, तेव्हा ते विशेषतः त्या क्रिकेटपटूची पत्नी, रितिका सजदेह हिच्याकडे लक्ष देतात. अमिताभ यांनी सांगितलं की, सामन्यादरम्यान त्यांची नजर अनेकदा रितिकाला (Ritika Sajdeh) शोधत असते आणि त्यामागे एक खास कारण आहे.

शोमध्ये सहभागी झालेल्या सोनाली नावाच्या स्पर्धकानं सांगितलं की, ती रोहितची प्रचंड चाहती आहे. तिनं गंमतीनं असंही म्हटलं की, ती स्वतःला रोहितची पत्नी मानते. यावर अमिताभ बच्चन यांनी हलक्या-फुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सोनाली तिथे त्याची पत्नी बनण्याच्या उद्देशानं आली होती, हे ते रोहित शर्माला नक्कीच सांगतील. त्यानंतर, बिग बींनी रोहित शर्माची पत्नी रितिकाशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला.

KBC मध्ये सोनालीनं रोहित शर्माबद्दलसाठी क्रेझी असल्याचं सांगितलं 

‘कौन बनेगा करोडपती 18’ मध्ये क्रिकेटशी संबंधित एका प्रश्नावेळी, अमिताभ बच्चन यांनी सोनालीला या खेळातील तिच्या आवडीबद्दल विचारलं. यावर उत्तर देताना, स्पर्धकानं भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माबद्दलची आपली आवड आणि आदर मोकळेपणानं व्यक्त केला. यावेळी स्पर्धक सोनाली म्हणाली की, “सर, मी रोहित शर्माची खूप मोठी चाहती आहे आणि त्याला भेटणं हे माझं एक मोठं स्वप्न आहे, खरं तर, मी स्वतःला त्याची पत्नीच मानते.” तिच्या या बोलण्यावर अमिताभ बच्चन यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले, “असं दिसतंय की तुझ्या मनात त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे; आम्ही त्याला हे नक्की सांगू. आम्ही त्याला हेही सांगू की तू त्याची पत्नी बनण्याच्या उद्देशानेच इथे आली होतीस.”

बिग बीसुद्धा रोहित शर्माचे फॅन

सोनालीच्या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही रोहित शर्माबद्दलची आपली पसंती व्यक्त केलीय. ‘बिग बी’ यांनी सांगितलं की, त्यांना रोहित शर्मा खूप आवडतात आणि त्यांनी अनेकदा त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संवादही साधला आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, “तो माझा अत्यंत आवडता खेळाडू आहे, मला तो खूप आवडतो आणि मी अनेकदा त्याच्याशी वैयक्तिकरित्या बोललोय…” त्यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा जेव्हा रोहित खेळतो, तेव्हा ते त्याचे सामने आवर्जून पाहतात. 

रितिकाची ‘फिंगर्स क्रॉस’ करण्याची सवय खूपच भारी

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, जेव्हा रोहित शर्मा मैदानात खेळत असतो, तेव्हा रितिका नेहमीच ‘फिंगर्स क्रॉस’ करून ठेवते. ते म्हणाले की, “जेव्हा तो खेळतो, तेव्हा मी त्यांना पाहतोच; पण त्याचबरोबर मी स्टेडियममधील त्याच्या पत्नीकडेही लक्ष ठेवतो, कारण रोहित खेळत असताना ती नेहमीच क्रॉस फिंगर्स करुन असते…” बिग बींनी सांगितलं की, रितिकाच्या या सवयीबद्दल त्यांना खूप कुतूहल वाटतं, त्यामुळे त्यांनी नंतर रोहितला त्याबद्दल विचारलं देखील होतं.

रितिका लग्नापूर्वीही असंच करायची…

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी रोहितला रितिकाच्या ‘फिंगर्स क्रॉस’ करण्याच्या सवयीबद्दल विचारलं, तेव्हा रोहित शर्मानं त्यांना सांगितलं की, लग्नापूर्वीही ती अशीच करायची… अमिताभ बच्चन म्हणाले की, “मला याचं आश्चर्य वाटलं, म्हणून मी त्याला त्याबद्दल विचारलं, त्यावर त्यानं सांगितलं की, हो, लग्नापूर्वीही त्याची पत्नी अशा प्रकारे बोटं गुंफून ठेवायची…” ही एक अतिशय हृदयस्पर्शी बाब असल्याचं सांगत ‘बिग बीं’नी नमूद केलं की, रोहित जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा रितिकाची ही सवय आजही पाहायला मिळते. त्यांच्या मते, ही एक अतिशय सुंदर आणि मनाला भावणारी गोष्ट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *