Ketan Agarwal Murder : लग्नासाठी कोट्यवधी खर्च? विशाल अग्रवालांनी फेटाळला दावा ; उदयपूर लग्नाबाबत दिली मोठी माहिती – Marathi News | Ketan Agrawal Murder Case : Father Reveals Lohagad Lure, Fake Insta Trap


रणजीत जाधव, प्रतिनिधी : लोहगडावर फिरायला गेलेला केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याच्या मृत्यूमुळे पुण्यातच नव्हे तर अख्ख्या राज्यातच खळबळ माजली आहे. या हत्याकांडप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असून याप्रकरणाी हजारो पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. केतनने त्याची होणारी पत्नी सियाच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता, त्याच्या मोबाईलमध्ये सियाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट उघडलं होतं, अशी माहिती कतेनची बहीण संजना हिच्या जबाबातून समोर आली आहे. आता केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी अनेक मोठे, धक्कादायक खुलासे देखील केले आहेत.

केतन आणि सियाचा फेब्रुवारी 2026 मध्ये साखरपुडा झाला, या वर्षाअखेरीस त्यांचं लग्न होणार होतं. त्यांच्या लग्नासाठी मोठी तयारी करण्यात आली होती, कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, बरंच सोन खरेदी करण्यात आलं असे अनेक दावे करण्यात आले. यावर आता विशाल अग्रवाल यांनी मौन सोडलं आहे. लग्नासाठी कोट्यवधी खर्च केले, या फक्त अफवा आहेत, असं म्हणत त्यांनी याचं खंडन केलं. तसेच केतनला फसवून लोहगडावर नेलं होतं, अशी माहिती देखील विशाल अग्रवाल यांनी दिली.

काय म्हणाले विशाल अग्रवाल ?

असं काहीही नाहीये. अजून लग्न व्हायला खूप वेळ होता. आत्ताच खर्च कुठून करणार ? खर्चाबाबत या ज्या अफवा आहे, तसं काहीच नाहीये. आम्ही हे लग्न उदयपूरला करणार होतो, त्यासाठी छोटसं हॉटेल बूक केलं होतं. त्याला अजून कसलेही पैसे दिलेले नाहीत. ॲडव्हान्स म्हणून फक्त छोटी-मोठी रक्कम दिली. पण लग्नाचा खर्च काही कोट्यवधी वगैरे नव्हता, ही सगळी चुकीची बातमी फिरते आहे, असं विशाल अग्रवाल म्हणाले.

खोटं इन्स्टा अकाऊंट बनवून, केतनला फसवून लोहगजावर नेलं

याप्रकरणी त्यांनी अजून एक मोठा खुलासा केला. 18 जूनला केतनला फसवून लोहगडावर नेलं असा दावा त्यांनी केला. माही जे नावाने इन्स्टाग्रामवर एक खोटं अकाऊंट तयार केलं होतं. आम्ही सियाला वाढदिवसाचं सरप्राईज देणार आहोत, तू सियाला घेऊन तिथे ये, असं या अकाऊंटवरून केतनला सांगण्यात आलं . सिया आणि चेतन चौधरीच हे फेक अकाऊंट चालवत होते, असं विशाल अग्रवाल म्हणाले. सरप्राईजसाठी केतन सियाला तिथे घेऊन गेला आणि तिथे आरोपींनी त्यांचा डाव साधला, असा आरोप त्यांनी केला.

याप्रकरणी एक महिला साक्षीदार आहे, तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असाही दावा त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *