लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य


Swara Bhaskar:बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) कायमच तिच्या थेट आणि रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असते.  सध्या ‘राइज अँड फॉल’ (Rise And Fall) या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये स्वरा आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसलीय. नुकतंच तिने आई होण्याच्या निर्णयाबाबत मोठा खुलासा केला. एका काळात आपलं लग्न होणार नाही, असं स्वरा हिला वाटत होतं. मात्र, तिला आई व्हायचं होतं. त्यामुळे तिने लग्नाशिवाय आई होण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे तिच्या घरच्यांनीही तिच्या निर्णयाला पाठींबा दिलेला. पण नंतर एका आंदोलनामध्ये झालेल्या भेटीमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं.

स्वरा भास्करने दोन वेळा केलं IVF

‘राइज अँड फॉल’शो मध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की,एक काळ असा होता जेव्हा तिला वाटायचं की तिचं कधीच लग्न होणार नाही. मात्र, तिला आई व्हायचं होतं. त्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांशी याबाबत चर्चा केलेली.स्वराने सांगितलं की, ती IVFच्या माध्यमातून आई होण्यासाठी तयार होती आणि तिने आपल्या आई-वडिलांनाही या निर्णयासाठी तयार केलं होतं. “मला वाटलं होतं की माझं लग्न तर होणार नाही, त्यामुळे IVFच्या माध्यमातूनच मूल होईल,” असं तिने सांगितलं.

स्वराच्या आई-वडिलांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, एकट्याने मुलाचा सांभाळ करणं किती आव्हानात्मक असू शकतं, याची जाणीवही त्यांनी तिला करून दिलेली. तरीही मुलाला जन्म देण्याचा तिचा निर्णय असल्यास आपण तिच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं.स्वराने पुढे सांगितलं की, तिने अनोळखी स्पर्म डोनरच्या मदतीने दोन वेळा IVF करून पाहिलं होतं. मात्र, दोन्ही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

CAA आंदोलनाने बदललं आयुष्य 

दरम्यान, स्वराच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आलं. CAA आंदोलनादरम्यान तिची भेट फहाद अहमद यांच्याशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.फेब्रुवारी 2023 मध्ये स्वरा आणि फहाद यांनी मुंबईत लग्नाची नोंदणी केली. त्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नाचा सोहळाही केला.सप्टेंबर 2023 मध्ये दोघांनी आपल्या मुलीचं स्वागत केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *