Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक


Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता (Bollywood Actor) आणि फिल्म निर्माता (Film Producer) यशपाल शर्माचा (Yashpal Sharma) सख्खा भाऊ राजेश कुमार याला हिसार इथे 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. हरियाणाच्या (Haryana) लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं याप्रकरणी अभिनेत्याच्या भावाला अटक केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्याचा भाऊ असलेला राजेश कुमार हे ‘जल सेवा मंडळ’ इथे ‘सहाय्यक महसूल लिपिक’ म्हणून कार्यरत आहेत. एसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, राजगड-चंदीगड महामार्गालगतच्या शेतजमिनीवर वसलेल्या एका वसाहतीसाठी कालव्याच्या पाण्याद्वारे सिंचनाच्या व्यवस्थेशी संबंधित ‘ऑक्युपन्सी सर्टिफिकेट’ तयार करून देण्याच्या बदल्यात त्यांनी एका तक्रारदाराकडे ही रक्कम मागितली होती.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर, एसीबीच्या (ACB) हिसार पथकाने स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचला. यावेळी राजेश कुमार 3000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडला गेला. ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बॉलिवूड आणि हरियाणवी सिनेसृष्टीतील कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते यशपाल हे ‘दादा लखमी’ या चर्चेत असलेल्या सिनेमाच्या निर्मितीशीही जोडले गेलेले आहेत.

अटकेत असलेले राजेश कुमारनं यांनी कोणत्या प्रकरणात लाच मागितली?

हरियाणाच्या एसीबी (ACB) मधील तपास अधिकारी नरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, आर्य नगर येथील रहिवासी राकेश कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, त्यांच्या गावातील राजगड-चंदीगड महामार्गालगतच्या शेतजमिनीवर एक कॉलनी विकसित करण्यात आली होती. कालवा सिंचन प्रणालीसाठी ‘कमांड एरिया ऑथोरायझेशन’ (CAA) मिळवण्याकरिता हिसार कालवा विभागाकडे अर्ज सादर करण्यात आला होता आणि हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी राजेश कुमारवर होती.

COO साठी 3 हजारांची लाच मागितली

मिळालेल्या तक्रारीनुसार, राजेश कुमार यानं ‘सीओओ’ (COO) मिळवून देण्याच्या बदल्यात राकेश यांच्याकडे 3000 रुपयांची मागणी केली होती. तक्रार प्राप्त होताच, हांसी येथील एसीबी (ACB) उप-केंद्राच्या पथकानं सापळा रचला आणि तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना राजेश कुमारला अटक केली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अन्वये हिसार विभागातील ‘राज्य दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरो’च्या (State Vigilance and Anti-Corruption Bureau) पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *