AI Glassses : आता चष्म्यात मिळणार AI! Meta Connect 2026 मध्ये AI Glassesची मोठी घोषणा – Marathi News | Meta ai glasses 2026 features muse personal ai agent calling music video recording dolby atmos spatial audio ray ban meta audio and smart glasses update


चष्म्याच्या वापर फक्त लांबचे जवळचे पाहण्यासाठीच आहे. असा विचार जर तुम्ही करत असाल तर आताच थांबा,जमाना बदलतोय तसाच AI चा विस्तारही वाढत जातोय.सध्याच्या काळात चष्म्याचे काम फक्त पाहण्यासाठीच नसून त्याच्या आधारे आता रेकॉर्डिंग, व्हिडिओ शूटींग, कॉलिंग करणे, म्यूझिक ऐकण देखील शक्य होणार आहे. META CONNECT 2026 मध्ये कंपनीने AI GlSSES चे नवीन अपडेट जाहीर केले असून टेकविश्वात एक नव्या चष्म्याने एन्ट्री केली आहे.

MUSE थेट चष्म्यात

META ने आपला वैयक्तिक AI एजंट MUSE आता AI GLASSSES मध्ये आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना हातात फोन न घेता AI शी संवाद साधता येणार आहे. यामुळे यूजर्स ट्रॅवल तिकीट बुक करणे, फॉर्म भरणे, ईमेल पाठवणे यांसारखी कामे करू शकणार आहेत.

व्हिडिओचा आवाजही होणार जबरदस्त

META AI GLASSES मध्ये DOLBY ATOMS CAPTURE हे आणखी एक महत्त्त्वाचं फिचर आहे.यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करताना 360 डिग्री साउंड कॅप्चर करता येणार आहे. त्यासोबतच आवाजही अधिक immersive पद्धतीने रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Ray – Ban Meta Audio

Meta ने Ray – Ban Meta Audio नावाची ऑडिओ – केंद्रित AI GLASSES ची नवीन अपडेट केले आहे. विशेष म्हणजे या चष्म्यात कॅमेरा नसणार आहे. म्यूझिक आणि पॉडकास्ट ऐकणे, फोन कॉल करणे आणि Meta शी संवाद करणे यावर या ग्लासेसचा मुख्य भर आहे.

हे ग्लासेस 43 ग्रॅमचे असून एका चार्जमध्ये 12 तासांपर्यंत वापरता येणार आहे. चार्जिंग केसच्या मदतीने आणखी 48 तासांची बॅटरी मिळू शकते. Clumbster आणि Burbank या दोन स्टाईलमध्ये हे ग्लासेस उपलब्ध आहेत. हे ग्लासेस अमेरिकेत उपलब्ध असून भारतात केव्हा लाँच होणार याची माहिती समोर आलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *