Mushtaq Khan : ‘वेलकम’, ‘गदर’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा – Marathi News | Actor Mushtaq Khan Passes Away at the age of 56 Bollywood Mourns the demise of ‘Gadar’ and ‘Welcome’ Star


हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे, प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. ‘वेलकम’, ‘गदर’ ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक चित्रपटातील अभिनयातून प्रेक्षकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या मुश्ताक खान यांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या बऱ्याच काळापासून ते आजारी होते, मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार ते कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते. रिपोर्ट्सनुसार, त्यांना सुमारे पाच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. उपचारानंतर ते बरेही झाले होते; मात्र अलीकडेच त्यांचा हा आजार पुन्हा बळावला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. उद्या (25 सप्टेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मुश्ताक खान यांनी अनेक चित्रपटांत काम करत अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. बऱ्याच चित्रपटात ते सह-कलाकाराच्या भूमिकेत झळकायचे. मुश्ताक खान यांनी छोट्या पडद्यावरही बराच काळ काम केलं होतं.

शॉर्ट फिल्म्सपासून केली सुरूवात

मुश्ताक खान यांनी अनेक चित्रपटात काम केलं, पण ‘वेलकम’ चित्रपटातील बल्लूच्या भूमिकेमुळे त्यांना प्रामुख्याने ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीतील बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. मुश्ताक खान यांनी ८०च्या दशकात शॉर्ट फिल्म्समधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ते टीव्ही मालिकांमध्ये दिसू लागले. मुश्ताक खान यांनी ‘भारत एक खोज’, ‘नुक्कड’, ‘अदालत’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.

मुश्ताक खान यांचं काम

टीव्ही मालिकांनंतर मुश्ताक खान यांनी अभिनयाचं क्षेत्र विस्तारत मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला. हळूहळू ते चित्रपटांमध्ये दिसू लागले. ‘हम हैं राही प्यार के’, ‘हेरा फेरी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘जोडी नंबर 1’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या गाजलेल्या त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं. ते शेवटचे ‘भाबीजी घर पर हैं!’ या चित्रपटात दिसले होते. या विनोदी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *