Lay off : अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना कामावरुन टाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जागतिक मंदी, वाढता खर्च, एआयचा वाढलेला वापर या कारणामुळं अनेक कंपन्या नोकरकपात करताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेतील एकाा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्या कंपनीतील 80 भारतीय कामगारांना अचानक कामावरुन काढून टाकलं आहे. या कंपनीने गुगल मीटवर पाच मिनीटांची मिटिंग घेतली आणि कामगारांना कामावरुन काढून टाकलं आहे.
एका अमेरिकन कंपनीने अवघ्या पाच मिनिटांत सुमारे 80 भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच वापरकर्त्यांना धक्का बसला. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पाच मिनिटांची गूगल मीट घेतली, ज्यानंतर त्यांना तात्काळ प्रभावाने कामावरून काढून टाकण्यात आले. आता अनेकजण या क्रूरतेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
कर्मचाऱ्याने सांगितला अनुभव
एका कर्मचाऱ्याने या घटनेबद्दल रेडिटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने आपला अनुभव सांगितला आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे, “मला गूगल मीटवर कामावरून काढून टाकण्यात आले.” कालपर्यंत मी एका अमेरिकन बँकेच्या कस्टमर सपोर्ट टीमचा भाग होतो. कामकाजाच्या कारणांमुळे त्यांनी आम्हाला काल घरून काम करण्यास सांगितले. मी संध्याकाळी साडेसहाच्या शिफ्टमध्ये काम करत होतो आणि रात्री साडेनऊ वाजता त्यांनी आम्हाला गूगल मीटवर बोलावून कळवले की संपूर्ण भारतीय कस्टमर सर्व्हिस टीमला कामावरून काढून टाकण्यात आले आहे असं सांगितले.
सकेवळ 5 मिनिटांच्या एका कॉलचा परिणाम 80 कुटुंबांवर
सकेवळ 5 मिनिटांच्या एका कॉलचा परिणाम 80 कुटुंबांवर झाला. मला वाईट वाटतं की आम्ही अशा कंपन्यांमध्ये काम करतो ज्या आम्हाला कधीही कामावरून काढू शकतात. मी माझ्या कामात घेतलेल्या इतक्या मेहनतीचा मला पश्चात्ताप होत असल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवल्या. शिवाय, मला नवीन नोकरी कशी मिळेल की नाही हे माहित नाही! हे खूप किळसवाणं आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
कर्मचाऱ्याच्या पोस्टवर अनेक रेडिट वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण कंपनीच्या क्रूरतेवर टीका करत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अचानक नोकरी गमावली आहे, त्यांच्याबद्दल अनेकजण सहानुभूती व्यक्त करत आहेत. दरम्यान, जेव्हा एका वापरकर्त्याने कंपनीला कंपनीच्या वागणुकीचे आणि अचानक कामावरून काढण्याचे कारण विचारले, तेव्हा कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की कंपनीला त्यांच्या भारतीय टीमकडून चांगले काम मिळत नव्हते, त्यामुळेच सर्वांना कामावरून काढून टाकण्यात आले. कर्मचाऱ्याने असेही सांगितले की, अचानक कामावरून काढल्यानंतर कंपनी कोणताही आधार देत नाहीये. जे लोक वर्षभरापासून येथे काम करत आहेत, त्यांनाही फक्त 15 दिवसांचा पगार दिला जात आहे.