Flipkart च्या Big Billion Days Sale ची तारीख आली, फोन, लॅपटॉप तुफान स्वस्त; ऑफर्सचा पाऊस; वाचा नवी अपडेट! – Marathi News | Flipkart announced big billion days 2026 dates iphone and samsung mobile electronic deals offer


Flipkart Big Billion Days 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी

सध्या गणेशोत्सव सुरु आहे. आता आणखी मोठे सण येणार आहे. त्यामध्येच आता ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनेक मोठ्या ऑफर्स मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातली सर्वात मोठी शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आता पुन्हा बिग बिलियन डेज सेल फेस्टिव्हल घेऊन येणार आहे. २०२६मधल्या अधिकृत तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन फोन, लॅपटॉप किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे पैसै बजेट रेडी ठेवा. यावर्षीटा फ्लिपकार्टचा सेल ९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी आयफोनपासून सॅमसंग गॅलेक्सी सीरिजच्या फोनपर्यंत सर्व वस्तूंवर बंपर सवलत मिळण्याची शक्यता आहे. एवढच नाही तर कंपनीकडून एक वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांचा उत्साह आणखी वाढणार आहे.

दरम्यान, यामध्ये एक ट्वीस्टही आहे. सेल सर्वांसाठी ९ ऑक्टोबरला सुरु होईल. पण फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डधारकांना एक दिवस आधीच शॉपिंग करता येणार आहे. फ्लिपकार्टनं अशीही माहिती दिलीय की, या वर्षीच्या सेलमध्ये जागतिक ब्रँड्सच्या अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक किमती आणि ऑफर्स असतील. दरम्यान, सर्व सवलतींचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. एवढच नाही तर अॅक्सिस आणि आयसीआयसीआय बँकच्या कार्डवरुन पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकतो. फ्लिपकार्ट सुपरमनी आणि क्रेडिट कार्डवरही १० टक्के बचत मिळवू शकता.

दरम्यान सर्वांना प्रतिक्षा आहे ती स्मार्टफोनवरील ऑफर्सची. आयफोनप्रेमी खासकरुन या सेलवर लक्ष ठेऊन आहेत. अलिकेडेच कंपनीने त्यांच्या जुन्या फोन्सच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यामुळे या सेलमधून काही सवलत मिळू शकते का याकडे सर्वांचं लक्ष लागंलं आहे. सॅमसंग गॅलक्सी एस२६ सीरीजवरही बचत करता येऊ शकते. पण कंपनीने अद्यापर्यंत कोणतेही अधिकृत सूट जाहीर केलेली नाही. असा अंदाज लावला जात आहे की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बचत, सवलतींबाबत कंपनी काही तपशील जारी करु शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *