Horoscope Today 17 September 2026: आज गौरी आगमनाचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य..


Horoscope Today 17 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 17 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, आज गौरी आगमनाचा दिवस असल्याने हा दिवस देवी पार्वतीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या… 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. एखादे रखडलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे योग्य राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना संयम ठेवावा. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक व्यवहारांसाठी दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. कामात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात, मात्र घाई करू नका. घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस तुमच्या बोलण्याचा आणि निर्णयक्षमतेचा चांगला उपयोग होईल. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. एखादी नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. वरिष्ठांकडून काही महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. पैशांशी संबंधित मोठा निर्णय घेताना काळजी घ्या. घरातील व्यक्तींच्या भावनांचा विचार करून वागणे फायदेशीर ठरेल..

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या सकारात्मक दिवस राहू शकतो. कामात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. एखादी जुनी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढण्याचे संकेत आहेत. कामात नवीन संधी मिळू शकते. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल राहील.  

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस खर्चाचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवला तरी संयमाने परिस्थिती हाताळा. नातेसंबंधात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. विश्रांतीकडे लक्ष द्या.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. एखाद्या जुन्या मित्राची किंवा सहकाऱ्याची मदत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन जबाबदारी किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी नवीन संधी मिळू शकते. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून महत्त्वाची बातमी मिळू शकते.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात. सहकाऱ्यांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. जोडीदारासोबत शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील.. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत बचतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होऊ शकतात. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची भरभराट! सप्टेंबरचा तिसरा आठवडा सुरू, नशीब पालटायला सुरूवात, साप्ताहिक राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *