तुमच्या आधारकार्डाची दुरुस्त लिमिट संपली आहे का? किंवा आधार सेंटरवर जाऊनही तुमचे आधारकार्ड अपडेट होत नाही का? तर काळजी करू नका..लिमिट संपल्यानंतरही आधारकार्ड अपडेट कसं करायचं? हे आपण जाणून घेणार आहोत…. सर्वात आधी तुमच्या जवळच्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रात जा. तिथे त्यांना सांगा की तुमची लिमिट संपली आहे, तरीही तुम्हाला अपडेट करायचे आहे.
हे कागदपत्रं गरजेचे?
-तुमचे आधार कार्ड
-योग्य नाव किंवा जन्मतारखेचा पुरावा
-स्व-घोषणा पत्र हे फॉर्म तुम्हाला आधार केंद्रावरच मिळेल.
-हा फॉर्म भरून दिल्यानंतर केंद्र संचालक तुमचे बायोमेट्रिक्स घेतील आणि तुम्हाला एक ‘अपडेट पावती’ देतील. ही पावती सांभाळून ठेवा!
आता यानंतर तुम्हाला महत्वाची प्रोसेस करायची आहे
-तुम्हाला UIDAI ला ईमेल पाठवायचं आहे.
१. तुमचे आधार कार्ड
२. अचूक पुराव्याचे कागदपत्र (Birth Certificate)
३. भरलेले स्व-घोषणा पत्र
४. नवीन मिळालेली आधार अपडेट पावती
या सर्व कागदपत्राची एक PDF फाईल तयार करायची आहे
ही PDF फाईल UIDAI च्या अधिकृत ईमेल आयडी help@uidai.gov.in वर पाठवा.
ईमेलमध्ये तुमचा नोंदणी क्रमांक (Enrollment ID) टाका आणि लिमिट ओलांडल्यामुळे विशेष मंजुरी देऊन अपडेट करण्याची विनंती करा.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा: ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर नसेल, तर आधी आधार केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या.
ईमेल पाठवल्यानंतर UIDAI कडून तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि काही दिवसांत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल!