Mumbai Ganesh Idol fell down in Kurla: दक्षिण मुंबईतील भुलेश्वरचा राजा या गणपती मंडळासोबत घडलेली दुर्घटना ताजी असतानाच मंगळवारी मुंबईत आणखी एक गणेशमूर्ती (Ganesh Idol) पडल्याची घटना घडली. मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात एलबीएस रोडवर (LBS Road) हा प्रकार घडला. धारावीच्या ओम शक्ती वेलफेयर फाऊंडेशनतर्फे बसवण्यात येणारा ‘प्रेम नगरचा महाराजा’ (Premnagar cha Maharaja) या गपणतीचा मंगळवारी आगमन सोहळा होता. काल रात्री कुर्ल्याच्या बैलबाजार येथील कारखान्यातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘प्रेम नगरचा महाराजा’ची 15 फुटांची मूर्ती घेतली. यानंतर ट्रॉलीवरुन हा गणपती (Ganpati) धारावीच्या दिशेने निघाला होता. रात्री पावणेदहाच्या सुमारास हा गणपती कुर्ला येथील शीतल तलावाच्या परिसरात आला. याठिकाणी रस्त्यावर एक गतीरोधक (Speed Breaker) होता. या स्पीडब्रेकवरुन जाताना गणपतीच्या ट्रॉलीला जोराचा झटका बसला. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना काही कळायच्या आत गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला कलंडली आणि खाली पडली. सुदैवाने मूर्ती पडताना मंडळाचे बहुतांश कार्यकर्ते बाजूला झाले. मात्र, संतोष जैस्वार, रोहित जैस्वार हे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. त्यांना नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (Mumbai Ganesh festival 2026)
या दुर्घटनेनंतर शीतल तलावाच्या परिसरात गोंधळ उडाला होता. गणपतीची 15 फुटी मूर्ती खाली पडल्यामुळे तुटली. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड धक्का बसला. मूर्ती पडल्याची घटना समजताच विनोबा भावे नगर पोलीस तसेच परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले. या सगळ्यांनी सुरुवातीला काळ्या रंगाचे प्लॅस्टिक टाकून भग्न मूर्ती झाकली. यानंतर ‘प्रेम नगरचा महाराजा’ गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जड अंत:करणाने मूर्तीचे अवशेष जवळच्या शीतल तलावात विसर्जित केले.
Bhuleshwarcha Raja news: ‘भुलेश्वरचा राजा’ आगमन मिरवणुकीतील अपघाताच्या कटू आठवणी ताज्या
काही दिवसांपूर्वीच भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळून अशाचप्रकारची दुर्घटना घडली होती. भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेने जाताना हा अपघात झाला होता. गणपतीची मूर्ती मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर असताना हा प्रकार घडला होता. भुलेश्वरचा राजाची मूर्ती ज्या ट्रॉलीवर बसली होती त्या ट्रॉलीचे चाक खड्यात अडखळले होते. त्यामुळे 22 फुटांची मूर्ती समोरच्या बाजूला पडली होती. संकेत नेवशे (वय 33 वर्षे) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30 वर्षे) हे दोन मंडळाचे कार्यकर्ते या गणेशमूर्तीखाली दबले गेले होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
मुंबईत आगमनावेळी आणखी एका गणेशमूर्तीचा अपघात; तातडीने तलावात विसर्जन, नेमकं काय घडलं?
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती