शुबमन गिल Vs अभिषेक शर्मा..! सुरूवातीला जोरदार फटकेबाजी, नंतर काढली विकेट, दोन मित्रांचं द्वंद्व – Marathi News | Shubman Gill played aggressively at first but Abhishek Sharma took his wicket on the final ball


शुबमन गिल Vs अभिषेक शर्मा..! सुरूवातीला जोरदार फटकेबाजी, नंतर काढली विकेट, दोन मित्रांचं द्वंद्वImage Credit source: Twitter

Fazilka Falcons vs Amritsar Soormas: शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेत फाजिल्का फाल्कन्स आणि अमृतसह सूरमाज हे संघ आमनेसामे आले होते. पण खरी लढाई शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यात झाली. पीसीए स्टेडियममध्ये हा सामना झाला आणि शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यात द्वंद्व रंगलं. या सामन्यात शुबमन गिलने अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. पण शेवटी त्याची विकेट काढण्यात अभिषेक शर्माला यश आलं. अभिषेक शर्मा या सामन्याचं पहिलं षटक टाकण्यासाठी आली होती. पण दोघांची खरी लढत ही दहाव्या षटकात झाली.

दहाव्या षटकात अभिषेक शर्माच्या पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलने षटकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात अभिषेक शर्माला यश आलं. तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने चौकार मारला. चौथ्या चेंडूवर गिलने एकही धाव काढली नाही. पाचव्या चेंडूवर गिलने पुन्हा मिड विकेटवरून षटकार मारला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर जोरदार प्रहार करून हे षटक संपवेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. शुबमन गिलने फटका मारला खरा, पण मिड विकेट बाउंड्रीवर उभ्या असलेल्या नमन धीरने झेल पकडला. गिल बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने आनंद साजरा करत डान्स करू लागला. यावेळी गिल नारजा झाल्याचं पाहायला मिळाला. रागाच्या भरात त्याने मैदान सोडलं.

शुबमन गिलची विकेट अभिषेक शर्मानी काढली असली तर गिलने अर्धशतकी खेळी केली. गिलने 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने 8 चौकार आणि तीन षटकार मारले. गिलचा स्ट्राईक रेटन 190 च्या वर होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *