SGB : सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सचे गुंतवणूकदार मालामाल होणार, तब्बल 228 टक्के परतावा मिळणार, 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे बनले 3 लाख 28 हजार  


नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पारंपरिक सोन्याला पर्याय म्हणून सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स जारी केले होते. नोव्हेंबर 2015 पासून केंद्रसरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बॉण्डस जारी केले होते. एसजीबी 2021-22 सीरिज VI चे बॉण्ड खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना नियमाप्रमाणं 7 सप्टेंबरनंतर  5 वर्ष पूर्ण झाल्यानं मुदतपूर्व बाहेर पडण्याची परवानगी आहे. यासंदर्भात आरबीआयनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार एसजीबीच्या एका यूनिटसाठी  15334 रुपये मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. 

 Sovereign Gold Bonds : एसजीबी गुंतवणूकदार फायद्यात

एसजीबी 2021-22 सीरिज VI चे बॉण्ड जारी करण्यात आले तेव्हा एका यूनिटसाठी 4682 रुपये मूल्य निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार परताव्याचा विचार केला असता 5 वर्षानंतर बाहेर पडायचं असेल तर गुंतवणूकदाराला 15334 रुपये मिळतील. म्हणजेच 15334 रुपयांमधून गुंतवणुकीची रक्कम 4682 रुपये वजा केल्यास निव्वळ परतावा 10652 रुपये मिळेल. या परताव्याची टक्केवारी काढल्यास तब्बल 228 टक्के परतावा निश्चित होतो.  
  
सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सचा एक यूनिट एक ग्रॅमचा असतो. एसजीबी चा कालावधी 8 वर्षांचा असतो. मात्र, नियमानुसार 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यातून बाहेर पडता येते. त्यानुसार  एसजीबी 2021-22 सीरिज VI चे बॉण्ड 7 सप्टेंबर 2021 ला जारी करण्यात आले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठीचा 5 वर्षांचा कालावधी 7 सप्टेंबर 2026 पासून सुरु होत आहे.   

सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिलं जातं. हे व्याज वर्षातून दोन वेळा जमा केलं होतं. आरबीआयनं एसजीबीच्या एका यूनिटसाठी परतव्याची रक्कम 15334 रुपये निश्चित केलं आहे. म्हणजेच परतावा 227 टक्के मिळणार आहे. एखाद्या गुंतवणूकदारानं एसजीबीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर  त्याचं मूल्य आता 3 लाख 28 हजार रुपये झालं असेल. यामध्ये व्याजाच्या रकमेचा समावेश नाही. 

दरम्यान, केंद्र सरकारनं 2024 नंतर एसजीबी बॉण्डची विक्री थांबवली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारनं शेवटचे एसजीबी बॉण्ड जारी केले होते. 2023-24 सीरिज IV मालिकेतील बॉण्डच्या एका यूनिटचं मूल्य  6263 रुपये होते. 

दरम्यान, नोव्हेंबर 2015 मध्ये  पहिल्यांदा बॉण्ड जारी केले होते तेव्हा त्याचा कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदारांना 128 टक्के परतावा मिळाला होता. तर, 2018-19 च्या सीरिज-I चा परतावा 386 टक्के होता.  

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *