Deeol Band 3 Update Pravin Tarde: ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानंतर ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांत वर्ल्डवाईड 100 कोटींचा टप्पा ओलांडला. या सिनेमातून पुन्हा एकदा मोहन जोशी (Mohan Joshi) प्रचंड चर्चेत आले होते. साधारण 8 ते 10 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. दरम्यान, आता या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची चर्चा होऊ लागली आहे. ‘देऊळ बंद’ या सिनेमाचा तिसरा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटाच्या शुटिंगला (Shooting) लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाच्या शेवटी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार, याची हिंट देण्यात आली होती. दरम्यान, हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
‘देऊळ बंद 3’चं शुटिंग कधी सुरू होणार? (Pravin Tarde Begins work on third part of Deeol Band story)
प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनीत ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. आता या सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘देऊळ बंद 2’ या सिनेमात मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: भावूक केलं होतं. आता ‘देऊळ बंद’ या सिनेमाचा तिसरा सिक्वेल परदेशात शूट केले जाणार असल्याची माहिती आहे.
Variety Indiaच्या पोस्टनुसार, प्रवीण तरडे पुन्हा एकदा ‘देऊळ बंद’ या आपल्या गाजणाऱ्या फ्रँचायझीसह लवकरच परतणार आहे. ‘देऊळ बंद 3’ हा सिनेमा सध्या निर्मितीच्या टप्प्यात असून, या सिनेमाची स्टोरी परदेशात म्हणजेच अमेरिकेतील असणार असल्याची माहिती आहे. हा सिनेमा आपल्या प्राथमिक टप्प्यात असून, कलाकार, स्टोरी आणि प्रोडक्शनचे शेड्यूल अद्याप ठरवण्यात आलेले नाहीत. या सिनेमाच्या चित्रिकरणाचे काम सुरू करण्यासाठी अधिक वेळ जाऊ शकतो. ‘देऊळ बंद 2’ हा सिनेमा 21 मे 2026 रोजी रिलीज झाला होता. महिनाभर हा सिनेमा चित्रपटगृहात सुरू होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: