Hanuman Ansh Box Office Collection: ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कमाईचा नवा इतिहास रचला. सनी देओलनेही ‘बॉर्डर 2’ने आपला दबदबा कायम ठेवला. शिवाय ‘जन नायकन’, ‘टॉक्सिक’ आणि ‘करुप्पु’ यांसारख्या सिनेमेहीही बॉक्स ऑफिसवर चर्चेत राहिले. मात्र, एखाद्या सिनेमाचं यश केवळ त्याच्या कमाईवर ठरत नाही, तर त्याने मिळवलेल्या नफ्यावरही ठरतं. नफ्याच्या बाबतीत 2026 मध्ये नुकताच रिलीज झालेला ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh) हा सिनेमा इतिहास रचताना दिसत आहे. प्रॉफिटच्या बाबतीत ‘हनुमान अंश’ने ‘धुरंधर 2’लाही मागे टाकलं आहे. एवढेच नाही तर, लोक गळ्यात भगवे स्कार्फ घालून, चपला काढून सिनेमा पाहत आहेत. आधी कोणाला माहितही नसलेला सिनेमा पाहण्यासाठी तिकीट काउंटरवर रांगा दिसू लागल्या आहेत.
धुरंधर 2 पेक्षाही ‘हनुमान अंश’चा नफा अधिक
‘धुरंधर 2’ हा 2026 मधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. या सिनेमाने भारतात तब्बल 1149.30 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे.आतापर्यंत कोणत्याही सिनेमाला एवढी कमाई करता आलेली नाही. मात्र, नफ्याच्या बाबतीत संत नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ने आदित्य धर यांच्या सिनेमाला मागे टाकलं आहे.
‘हनुमान अंश’ हा अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे. निर्मात्यांनी या सिनेमासाठी केवळ 2 कोटी रुपये खर्च केले होते. 7 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत 54 कोटी रुपयांची कमाई केली आहे.एखाद्या सिनेमाचा नफा हा त्याच्या बजेटच्या तुलनेत किती कमाई झाली, यावर ठरतो. बजेटच्या तुलनेत सिनेमाच्या नफ्याचा विचार केला, तर ‘हनुमान अंश’ने 2000 टक्क्यांहून अधिक नफा कमावल्याचं सांगितलं जात आहे. तर ‘धुरंधर 2’चा नफा सुमारे 1000 टक्के असल्याचं म्हटलं जात आहे.
वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीचा मोठा फायदा
‘हनुमान अंश’च्या यशाची तुलना नसीरुद्दीन शाह आणि दिलजीत दोसांझ यांच्या ‘मैं वापस आऊंगा’ या सिनेमाशी केली जात आहे. सुरुवातीच्या काळात हा सिनेमा प्रदर्शित झालाय, याचीही फारशी चर्चाही नव्हती. पहिल्या आठवड्याच्या कामगिरीनंतर तर सिनेमाला फ्लॉप मानलं जात होतं. मात्र, दुसऱ्या आठवड्यात ज्यांनी हा सिनेमा पाहिला, त्यांनी त्याचं कौतुक करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या या वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीचा सिनेमाला मोठा फायदा झाला. याचा अंदाज ‘हनुमान अंश’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून सहज लावता येतो.
‘HANUMAN ANSH’ RIDES A GROWING WAVE OF WORD OF MOUTH… An outpouring of emotion continues to follow the #HanumanAnsh team across #Maharashtra, #Gujarat and the North belt as they visit theatres, spiritual centres, and devotee communities, with audiences sharing how deeply the… pic.twitter.com/CdRppwvxXJ
— taran adarsh (@taran_adarsh) August 18, 2026
लक्ष्मण दास ते नीम करोली बाबा; कथेनं जिंकलं मन
लक्ष्मण दास यांच्यापासून नीम करोली बाबा होण्यापर्यंतची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. सिनेमाच्या पहिल्या तीन दिवसांची कमाई अवघी 60 लाख रुपये होती. मात्र, त्यानंतर सिनेमाच्या कमाईने वेग पकडला.ट्रेड ॲनालिस्टच्या मते, अवघ्या 26 दिवसांत ‘हनुमान अंश’ने ज्या वेगाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे, तो पाहता आगामी काळात हा सिनेमा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. कमी बजेट, सुरुवातीचा थंड प्रतिसाद आणि त्यानंतर वर्ड ऑफ माउथच्या जोरावर मिळालेलं यश यामुळे ‘हनुमान अंश’ 2026 मधील सर्वात चर्चेत असलेल्या स्लीपर हिट सिनेमांपैकी एक ठरत आहे.