Financial Changes From 1 September 2026: दूधपासून रिक्षा, टॅक्सी, CNG पर्यंत…; आजपासून काय महाग? पाहा 10 महत्वाचे बदल, A टू Z माहिती


Financial Changes From 1 September 2026: आज, 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई-महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे दरबदल लागू झाले आहेत. विशेषतः मुंबईकरांसाठी दूध, CNG आणि रिक्षा-टॅक्सी महाग झाल्याने दैनंदिन खर्च वाढणार आहे. (Financial Changes Marathi News)

मुंबईत तबल्याच्या/सैल म्हशीच्या दुधाचा घाऊक दर 93 वरून 102 प्रति लिटर झाला आहे. ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून लागू झाली असून सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना यापेक्षा जास्त दर द्यावा लागू शकतो. तर मुंबई महानगर प्रदेशात 1 सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे 26 वरून 27, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे 31 वरून 33 झाले आहे. पहिल्या 1.5 किमीच्या प्रवासासाठी हे नवीन किमान दर लागू आहेत. मीटरमध्ये नवीन दर सेट करण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे; तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्डचा वापर करण्याची व्यवस्था आहे. (Financial Changes From 1 September 2026)

मुंबईत सीएनजी-पीएनजीही महाग- (CNG PNG Marathi News)

19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 9.50 पर्यंत वाढ झाली आहे. मात्र 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात आजच्या बदलानुसार वाढ झालेली नाही, त्यामुळे घरगुती ग्राहकांना या बाबतीत सध्या दिलासा आहे. MMRमध्ये CNGच्या दरात ₹2 प्रति किलो, तर घरगुती PNGच्या दरात 1 प्रति SCM वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि CNGवर चालणाऱ्या वाहनांचा खर्च वाढणार असून घरगुती गॅस बिलावरही परिणाम होईल. या वाढीचा परिणाम MMRमधील मोठ्या संख्येने ग्राहकांवर होणार आहे.

आजपासून काय महाग? काय बदल? (Whats getting costlier from today? Whats changing?)

  1. मुंबईत सीएनजी प्र.किलो 2 रुपयांनी महाग, नवा दर 88 रु.
  2. मुंबईत पीएनजी गॅस 1 रुपयांनी महाग 
  3. मुंबईत सुट्या दूध दरात 9 रु वाढ, नवे दर प्र.लि.102 रु.
  4. टाटा मोटार्स आणि ह्युंदाईच्या गाड्यांत 25 हजार रु.ची वाढ
  5. ऑटो रिक्षाचे किमान भाडे 26 रु. वरुन 27 रुपये
  6. टॅक्सीचे किमान भाडे 31 रु.वरुन 33 रुपये 
  7. केवायसी पूर्ण नसेल तर आजपासून गॅस सिलेंडर मिळणार नाही
  8. NCMC कार्डशिवाय महिला,ज्येष्ठ नागरिक व अन्य लाभार्थ्यांना मोफत बस प्रवास नाही
  9. आयकर रिटर्न्स भरण्याची मुदत काल संपली 
  10. विमानप्रवासासाठी मोबाईलमधला बोर्डिंग पासही पुरेसा

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *