ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वडेट्टीवार यांची माफी, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काय दिला सल्ला? – Marathi News | Wadettiwar apologizes over OBC certificate claim Supriya Sule gives her first reaction what advice did she offer


काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठा दावा केला होता. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच मराठा समाजातील अनेक बड्या नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत, शरद पवार यांच्याकडे आहे की नाही, याची मला कल्पना नाही, त्यावर मी बोलणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. दरम्यान वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिक घेतल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर अखेर विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्या प्रकरणात माफी मागितली. मी अनावधानानं बोललो असं त्यांनी म्हटलं. यावर आता सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख काँग्रेसकडून गुंगी गुडीया असा करण्यात आला होता, त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रमाणपत्राबाबत मोठा दावा केला आहे. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक महिलांना टार्गेट केलं जात आहे का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. दरम्यान यावर उत्तर देताना मी या टीकेकडे एक महिला वगैरे म्हणून बघत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कारण मी एक लोकप्रितिनीधी आहे, त्यामुळे लोकांनी मला पुरुष आणि महिला अशा सर्वांची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. जेवढं मला पुरुषांचं मतदान झालं, तेवढंच मला महिलांनी देखील मतदान केलं आहे. माझ्यावर जी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, ती मी निष्ठने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले अनावधानानं बोललो. मात्र काही गोष्टी या संवेदनशील असतात, त्यामुळे बोलताना खबरदारी घेतली पाहिजे. वडेट्टीवार म्हणाले अनावधानाने बोललो, त्यावर आता पडदा टाकू अशी प्रतिक्रिया यावर सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *