Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…


Horoscope Today 22 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 ऑगस्ट 2026, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शनिवार आहे. हा दिवस शनिदेवांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीत कोणतेही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही, वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या ऐकण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक न राहिल्यामुळे आहे, त्या परिस्थितीशी समझोता करावा लागेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांनी कोणावर विसंबून राहू नये, थोडा एकलकीपणा एकटे राहण्याची वृत्ती राहील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःला समाजात प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थीचा आधार घ्यावा लागेल, त्यामुळे कामे पटापट होतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची ध्येयधोरणे अव्यवहारी नाहीत ना हे तपासून पाहणे गरजेचे ठरेल, गुप्त शत्रूंपासून सावध राहा 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्या गोष्टी तुमच्या कक्षाबाहेरच्या आहेत त्याचा विचार सुद्धा करू नका, महिलांनी भावनेचा अतिरेक अविवेकी प्रेम करू नये 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडी असुरक्षितपणाची भावना तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे थोडे अस्थिर बनाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याची साथ कमी मिळाली तरी, व्यवसायात एखादी ठरवलेली गोष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रकृतीला जपावे लागेल, सभोवतालच्या माणसाशी चांगले हितसंबंध ठेवाल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये बरोबरीचे लोक पुढे जातील आणि तुम्ही आहे तिथेच असल्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इस्टेट विषयीची कामे मार्गी लागतील, तुमच्या कल्पकतेला लोक दाद देतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दूरदृष्टी ठेवून काम कराल, महिला तडफदार बनतील आत्मविश्वास वाढेल.

हेही वाचा :

Hindu Religion: देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवलीय? आधी कोणाची पूजा? मांडणी कशी असावी? धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *