Eating With Henna Hands Risks : श्रावण महिना असो किंवा लग्नसराई, महिलांच्या हातावर मेहंदी लागणे ही आपल्याकडील एक परंपरा आहे. परंतु, अनेकदा मनात शंका येते की मेहंदी लावलेल्या हाताने स्वयंपाक करणे किंवा जेवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? डॉक्टरांच्या मते, नैसर्गिक आणि शुद्ध मेहंदी आरोग्यासाठी घातक नसते. कारण ती ‘हिना’ नावाच्या नैसर्गिक वनस्पतीपासून बनवली जाते.
परंतु, बाजारात गडद रंगासाठी मिळणाऱ्या केमिकल युक्त मेहंदीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मेहंदी लावताना ती शुद्ध आहे की केमिकल युक्त, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Chemical Henna Danger : ‘ब्लॅक मेहंदी’ आणि PPD केमिकलचा धोका
आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या मेहंदीमध्ये रंग पटकन आणि गडद आणण्यासाठी विविध रसायने मिसळली जातात. विशेषतः “ब्लॅक मेहंदी” मध्ये PPD (Para-phenylenediamine) नावाचे घातक केमिकल असते.
त्वचेची ॲलर्जी: या केमिकलमुळे त्वचेवर खाज, जळजळ किंवा लाल पुरळ उठू शकते.
पोटाचे विकार: जर हातावर केमिकल युक्त मेहंदी असेल आणि त्याच हाताने वारंवार अन्न खाल्ले गेले, तर ते केमिकल पोटात जाऊन पोटाचे विकार किंवा ॲलर्जी होऊ शकते.
Henna Food Safety Hygiene : आजारपणाचे मुख्य कारण: मेहंदी की अस्वच्छता?
तज्ज्ञांच्या मते, मेहंदी शुद्ध असल्यास केवळ ती हातावर असल्यामुळे कोणताही मोठा आजार होत नाही. परंतु, सण किंवा लग्नसराईत हातावर मेहंदी पूर्णपणे सुकेपर्यंत किंवा लावल्यानंतर बोटांची स्वच्छता राखणे कठीण जाते.
हातांवर जमा झालेली धूळ, माती, बॅक्टेरिया आणि जंतू जेवताना अन्नासोबत पोटात जातात. यामुळे पोटदुखी, उलटी किंवा जुलाब (Food Poisoning) यांसारखे त्रास होतात. ही समस्या थेट मेहंदीमुळे नाही, तर हाताच्या अस्वच्छतेमुळे निर्माण होते.
Eating With Henna Precautions : मेहंदी लावताना आणि जेवताना कोणती काळजी घ्यावी?
नैसर्गिक मेहंदीचा वापर: बाजारातील स्वस्त आणि केमिकल युक्त ब्लॅक मेहंदी ऐवजी नेहमी नैसर्गिक आणि चांगल्या दर्जाचीच मेहंदी वापरावी.
हातांची योग्य स्वच्छता: जेवण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवावेत, विशेषतः बोटांमधील भाग नीट साफ करावा.
मेहंदी ओली असताना जेवणे टाळा: मेहंदी जोपर्यंत पूर्णपणे वाळत नाही किंवा हातावरून पूर्णपणे निघत नाही, तोपर्यंत हाताने अन्न खाणे टाळावे.
डॉक्टरांचा सल्ला: मेहंदी लावल्यानंतर हातात सतत जळजळ, खाज किंवा लालसरपणा आल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
ही बातमी वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator