रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा


Uday Samant Press : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात, या सगळ्या त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची (Chakan MIDC) प्रक्रिया सुरु केली आहे. याच मुद्यावरुन आज उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

Uday Samant : नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत म्हणाले. वाहतूक कोंडीबाबत शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म निर्णय घेतल्याची माहिती सामंतांनी दिली. आरएमसी सारखे मटेरियल वापरून शॉर्ट टर्म मध्ये खड्डे बुजवले जातील असेही ते म्हणाले. अनेक रस्ते मंजूर झालेत, जे कंत्राटदार वेळेत काम करत नाहीत, त्यांना ब्लॅक लिस्ट टाकलं जाईल. घनकचरा प्रश्न महत्वाचा आहे. आम्ही त्यासाठी जागा देतोय. PMRDA त्याबाबत टेंडरही काढेल असे सामंत म्हणाले. 

अनधिकृत पार्किंग आणि ट्रॅफिक बाबत पोलीस कारवाई करतील

अनधिकृत पार्किंग आणि ट्रॅफिक बाबत पोलीस कारवाई करतील असेही सामंत म्हणाले. तीन-तीन मीटर रस्ते वाढवले जातील. सब स्टेशन वाढवले जातील. 59 कोटींचा रस्ता PWA कडे आहे, तिथं रात्रीत खड्डे भरले गेलेत. ट्रक टर्मिनल केलाय, MIDC ने हॉस्पिटल ला जागा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील सामंत यांनी दिली. पाणी पुरवठा बाबत संबंधित मंत्री स्वतः इथं येऊन बैठक घेतील, त्याबाबत ही तोडगा काढला जाईल. दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी दरबार करतील, म्हणजे बैठक घेऊन त्या-त्यावेळी तोडगा काढला जाईल. मी सुद्धा प्रत्येकवेळी येईन किंवा बैठक घेईन असे सामंत म्हणाले. दरम्यान, आजपासून दहा महिन्यात उद्योजकांना अपेक्षित सर्व कामं पूर्ण करण्याची डेडलाईन ठरविण्यात आली असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. तसेच मी प्रत्येक दोन महिन्याला बैठक घेणार, आढावा घेणार असल्याचेही सामंत म्हणाले. 

पाणीपुरवठ्याचा विषय देखील मार्गी लावला जाईल 

दरम्यान, चाकण MIDC मधील पाणीपुरवठ्याचा विषय देखील मार्गी लावला जाईल असे सामंत म्हणाले. जलजीवन मिशनच्या माध्यतून काय पाहिजे ते सांगितलं जाईल. स्वत: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील येतील असे सामंत म्हणाले. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *