Sai Sudharsan Ruled OUT IND vs SL Test Series : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार युवा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. सुदर्शन दुखापतीतून सावरण्यासाठी बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) रिहॅब करत होता. मात्र, त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी न झाल्याने त्याला या महत्त्वाच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ साई सुदर्शनशिवायच श्रीलंकेला रवाना झाला होता. सुदर्शन फिट झाल्यानंतर 8 ऑगस्टला श्रीलंकेत दाखल होईल, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यामुळे तो पहिल्या कसोटीपूर्वी संघाशी जोडला जाईल आणि प्लेइंग इलेव्हनच्या निवडीसाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता त्याच्या दुखापतीमुळे या सर्व समीकरणांवर पाणी फेरले आहे.
नेमकी काय आहे साई सुदर्शनची दुखापत? (Why Sai Sudharsan Ruled OUT IND vs SL Test Series)
साई सुदर्शनच्या उजव्या पायाला स्ट्रेसची समस्या असल्याचे समोर आले आहे. दुखापतीनंतर त्याने रिहॅबची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचबरोबर तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सरावही करत होता. त्यामुळे तो लवकरच पूर्णपणे फिट होईल, अशी आशा होती. मात्र, सराव सुरू असतानाही त्याला अजूनही काही प्रमाणात त्रास जाणवत आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुदर्शनला संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा अद्याप नाही (BCCI No Update On Sai Sudharsan)
साई सुदर्शनच्या जागी संघात कोणाचा समावेश होणार, याबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, त्याच्या रिप्लेसमेंटसाठी दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खान हे दोन प्रमुख दावेदार मानले जात आहेत. सुदर्शनच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील जागा भरून काढण्यासाठी निवडकर्त्यांसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
सुदर्शनच्या जागी कोणाला मिळणार संधी? (Who will take Sai Sudharsan place?)
साई सुदर्शन हा सध्या भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा युवा फलंदाज मानला जातो. त्यामुळे त्याची अनुपस्थिती संघासाठी नक्कीच मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. आता त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड की सरफराज खान? यापैकी कोणाला संघात स्थान मिळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. निवडकर्त्यांसमोर दोन्ही पर्याय वेगवेगळ्या कारणांमुळे महत्त्वाचे आहेत. ऋतुराजकडे तंत्र आणि सातत्यपूर्ण फलंदाजीची क्षमता आहे, तर सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या धावा करून कसोटी संघातील आपली दावेदारी यापूर्वीच सिद्ध केली आहे. त्यामुळे सुदर्शनच्या रिप्लेसमेंटची घोषणा होताच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचे समीकरणही बदलण्याची शक्यता आहे.
साई सुदर्शनच्या वगळल्यानंतर श्रीलंका कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, आकिब नबी दार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल आणि सरांश जैन.
भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी : 15-19 ऑगस्ट (2026), गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गले
- दुसरी कसोटी : 23-27 ऑगस्ट (2026), सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो
हे ही वाचा –