नवी दिल्ली: केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात २०० रुपयांपेक्षा जास्त कपात जाहीर केली आहे. पश्चिम आशियातील संकट आणि इराण युद्धामुळे जागतिक बाजारात पुरवठ्यावर परिणाम होऊन गॅसच्या किमती वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा सलग दुसरा मोठा दिलासा आहे. दरम्यान, घरगुती ग्राहकांना मात्र सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात देखील व्यावसायिक गॅस सिलेंडर अचानक स्वस्त झाला आहे,
LPG price cut today: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा भाव घटला
बुलढाणा जिल्ह्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १९४ रुपयांनी स्वस्त झाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १९४ रुपयांची कमी झाले आहेत. आधी ३०३१ रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता मिळणार २८३७ रुपयात मिळणार आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या दराबाबत कुठलाही बदल होणार नाही, कमर्शियल सिलेंडर काही ठिकाणी २०० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाला आहे. केंद्र सरकारने शनिवारी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली.
LPG price cut today: नवीन दर तातडीने लागू करण्यात आले आहेत
दिल्ली: कमर्शियल सिलेंडर २०२ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
कोलकाता: सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांची कपात करण्यात आली असून, नवीन दर २,८७२.५० रुपये झाला आहे.
या दरकपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, कॅटरिंग सेवा आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
LPG price cut today: घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल नाही
ही दरकपात केवळ १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडर्सवरच लागू असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती पूर्वीसारख्याच राहतील. घरगुती ग्राहकांना दरकपातीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
LPG price cut today: सलग दुसऱ्यांदा मिळाला दिलासा
कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर कमी होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले होते.
LPG price cut today: इराण युद्ध अन् पश्चिम आशियातील संकटामुळे वाढले होते दर
गेल्या काही महिन्यांत इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक एलपीजी बाजारात अनिश्चितता निर्माण झाली होती. पुरवठा खंडित झाल्यामुळे कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींत सातत्याने वाढ झाली होती. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर सरकारने सलग दुसऱ्यांदा दरकपात करत व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.