Horoscope Today 2 August 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 2 ऑगस्ट 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
व्यवसाय किंवा नोकरी जेथे काम कराल तेथील वातावरण आनंददायी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
सहवासातील वृद्ध व्यक्तींचा ऐकावे लागेल आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे अनेक कामे मार्गी लागतील यंत्रावर काम करताना सावधगिरी बाळगा.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
प्रकृती स्वास्थ्यासाठी पैसा खर्च करावा लागेल नुसतं बोलण्यापेक्षा कृतीत आणलं तर चांगले होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
मुलांची मते पटली नाहीत तरी गप्प बसाल जोडीदाराची यामुळे चिडचिड होईल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आर्थिक स्थिती सुधारेल जुनी आणि वसूल होतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
डोळ्यांच्या विकारापासून सावधान चित्रकलेची आवड असणाऱ्यांना चित्र चितारण्यासाठी मूड लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल काही वेळेस भावनांचा कोंड मारा होईल.
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
थोडे एकलकोंडे बनाल महिला जास्तच काटकसरी बनतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
सहजासहजी स्वतःच्या कोणत्याच गोष्टींचा ताबा तुम्ही सोडत नसल्यामुळे तुमचा पक्केपणा लोकांच्या नजरेत येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तुमचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा सुधारेल तुमचे अस्तित्व जगाला दाखवण्यात गुंतून जाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
महत्वाकांक्षा वाढेल नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा फायद्याचा की तोट्याचा? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य