सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 


Aslam Shaikh Passes Away : सैराट फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaz Sheikh)  याचे वडील अस्लम शेख यांचे आज निधन झालं. ब्रेन हॅमेरेजवर मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, आज दुपारी  त्यांचे त्यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोककळा व्यक्त केली जात आहे. 

अभिनेता अरबाज शेखने काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासंदर्भात केला होता व्हिडीओ

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याने काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासंदर्भात रडत रडत एक व्हिडिओ केला होता. सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलच्या (Nobel Hospital) मनमानी कारभारावर त्याने आरोप केले होते. या हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध खरेदीसाठी सक्ती करण्यात येत असल्याचं अरबाजने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर एफडीएने कारवाई करत नोबेल हॉस्पिटलमधील संबंधित मेडिकल दुकानांची तपासणी करून या दुकानांवर कारवाई केली होती. अरबाजच्या वडिलांच्या उपचार संदर्भात ‘एबीपी माझा’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. आता ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaj Sheikh) याच्या वडिलांवर उपचारासाठी सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने पुढाकार घेतला होता. डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पूर्ण मदत करण्याचे मान्य केले होते. 

ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते

शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी पूर्ण मदत करण्याचा  निर्णय घेतला होता. तसेच एस पी न्युरोसायन्सच्या डॉ. वळसंगकर यांना वैद्यकीय मदत करण्याचे विनंती केली, त्यानुसार डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पूर्ण मदत करण्याचे मान्य केले होते. भिनेता अरबाज शेख याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान मोठा खर्च झाल्याने आर्थिक मदत आणि हॉस्पिटलकढून होणारी लूट याविषयी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर केला होता.

अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मेंदूविषयक विकार असल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडिलांची प्रकृती गंभीर असल्यामुळे अरबाज सतत त्यांच्या उपचारासाठी धडपड करत होता. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाज शेखनं जिवाचं रान केलं होतं. मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे, असं म्हणत रडत रडत त्यानं व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, त्याच्या वडिलांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अस्लम शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *