मराठा आंदोलन पुन्हा पेटणार ?, जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी बोलावली मराठा बांधवाची बैठक, काय नेमके होणार ? – Marathi News | Will the Maratha agitation flare up again? Manoj Jarange has called a meeting on July 29.


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ जुलै रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवाची एक बैठक बोलावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना हा निरोप पोहचवला आहे. आंतरवाली सराटीत सकाळी १० वाजता हजर व्हा असा निरोप मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा बांधवांना दिला आहे. त्यामुळे या २९ जुलै रोजी मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे मराठा बांधवाचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकतीच दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेत, त्यांच्या आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केला होता.  यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना येत्या २९ जुलै रोजी आंतरवाली सराटीत बोलावले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबींना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी नुकतेच  उपोषणाचे हत्यार उपसले  होते. सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले होते.

मनोज जरांगे यांनी मे महिन्यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मे महिन्यात भर उन्हात उपोषणाला सुरूवात केली होती. त्यांनी उन्हात बाज टाकत त्यावर उपोषण सुरू केले होते. ज्या बांधवांच्या ५८  लाख नोंदी सापडल्या, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या प्रमाणपत्राला व्हॅलेडीटी द्यावी, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून दर १५  दिवसांनी आढावा घ्यावा, ५८  लाख नोंदीचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशा मागण्या या उपोषणाच्या वेळी मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या शिष्टाईने जरांगे यांनी पदरात पाडून घेतल्या होत्या.

बैठकीत नेमके काय ठरणार ?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांची एक बैठक बोलावली आहे. जरांगे पाटील यांच्या टीमकडून राज्यभरातील मराठा बांधवांना या बैठकीसाठी निरोप देण्यात आला आहे. या २९ जुलैच्या बैठकीत जरांगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतरवाली सराटी येथे सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *