Chatur Maas 2026 : देवशयनी एकादशीबरोबरच चातुर्मासाची पण सुरुवात झाली आहे. हा तो काळ असतो जेव्हा भगवान विष्णु योगनिद्रे मध्ये जातात. याच दरम्यान अन्य देव-देवतेच्या हातात कार्यभार असतो. चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो, म्हणूनच याला चातुर्मास असे म्हणतात. हा काळ सांसारिक उत्सवांसाठी नसून उपासना आणि ध्यानासाठी मानला जातो.
या काळात भगवान विष्णूची पूजा, नामजप आणि तपश्चर्या केल्याने प्रचंड पुण्य मिळते. पुढील चार महिने विवाह, मुंज समारंभ आणि गृहप्रवेश यांसारखे विधी नाही होत. या कालावधीनंतर शुभ कार्याची सुरूवात 20 नोव्हेंबर ला देवउठनी एकादशी या दिवशी होईल. चातुर्मासाच्या या चार महिन्यांत वृषभ, कर्क, सिंह आणि तूळ राशीच्या व्यक्तींना भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळेल. या राशी देवाच्या आवडत्या राशी देखील आहेत.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकासाठी चातुर्मास खुप चांगला जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी हा काळ आहे. या काळात रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. जे काम करत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते. नवीन जबाबदार्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यावसायिकांना नफा मिळू शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
चातुर्मासादरम्यान कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढू शकतो. या काळात तुमची निर्णय क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. तुमच्या निर्णयामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे फायदेही मिळू शकतात.या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
सिंह रास (Leo Horoscope)
या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीच पूर्ण फळ भेटणार आहे. करियर मध्ये प्रगती होऊ शकते, ज्यामुळे समाजात मान -सन्मान वाढू शकतो. तुम्ही मोठे फळ प्राप्त करू शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात भाग्यवान ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. कुटुंबातील चालू असलेले मतभेद मिटू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Chatur Maas 2026 : चातुर्मासात ‘या’ 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?