Jio की Airtel? 100 रुपये अधिकचे भरून कोणत्या रिचार्ज प्लानमध्ये होणार जास्तीचा फायदा, जाणून घ्या – Marathi News | Jio or Airtel Find out which recharge plan offers greater benefits for an extra 100 rupees


Jio की Airtel? 100 रुपये अधिकचे भरून कोणत्या रिचार्ज प्लानमध्ये होणार जास्तीचा फायदा, जाणून घ्याImage Credit source: TV9 Network

Jio Vs Airtel Prepaid Plan Comparison: भारतात जिओ आणि एअरटेल प्रीपेड मोबाईलधारकांची संख्या अधिक आहे. जिओचा 999 रुपयांचा आणि एअरटेलचा 899 रुपयांचा प्लान आहे. पण या दोन्ही प्लानची तुलना करताना अनेकांना नेमका कोणता प्लान बेस्ट हे समजणं कठीण होतं. तसं पाहिलं तर या दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली डेटा आणि 5जी सारखे फायदे आहेत. पण वैधता, ओटीटी आणि एआय फिचर्समध्ये बराच फरक आहे. जिओधारकांना जास्तीची वैधता आणि अतिरिक्त फायदे मिळतात, तर एअरटेलधारकांना कमी किमतीच बेसिक सुविधा मिळतात. चला या दोन्ही प्लानमधील अंतर समजून घेऊयात.

जिओचा 999 रुपयांच्या प्लानमध्ये काय आहे?

जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 98 दिवसांची वैधता मिळते. यात प्रत्येक दिवसाला 2 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर स्पीड 64 केबीपीएस होतो. एलिजिबल युजर्सला जिओ ट्रू 5 जी कव्हरेज भागात अनलिमिटेड डेटा मिळतो. यासह अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये तीन महिन्यांचं जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन, 50 जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेज आणि 18 महिने गूगल जेमिनी प्रो सब्सक्रिप्शन मिळते. यासह 5 टीबी क्लाउड स्टोरेज आणि इतर एआय फिचर्सचा फायदाही मिळतो.

एअरटेलचा 899 रुपयांच्या प्लानमध्ये काय आहे?

एअरटेलचा 899 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात प्रत्येक दिवशी 1.5 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच लिमिट संपलं की हा स्पीड 64 केबीपीएसचा होतो. प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटिडी आणि रोमिंग कॉलिंगसह रोज 100 एसएमएस मिळतात. कंपनी या प्लानसह फ्री हॅलो ट्यून सुविधा देते. यात युजर्स प्रत्येक 30 दिवसात काही खर्च न करता नवी ट्यून सेट करू शकतात. एलिजिबल युजर्सला सपोर्टेट भागात अनलिमिटेड 5जी डेटा मिळतो. पण एसएमएश लिमिट संपल्यानंतर प्रत्येक एसटिडी एसएमएससाठी 1.5 रुपये चार्ज लागतो.

कोणता प्लान फायद्याचा?

तुम्हाला कमी खर्चात फक्त कॉलिंग आणि डेटा सुविधा असेल तर एअरटेलचा 899 रुपयांचा प्लान सर्वोत्तम आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. पण जिओत 100 रुपये अतिरिक्त मोजून 98 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच 14 दिवस अधिकचे मिळतात. तसेच रोजचा 2 जीबी डेटा, जिओहॉटस्टार मोबाईल, जिओएआयक्लाउड आणि गुगल जेमिनी प्रो सारखे फायदे मिळतात. त्यामुळे तुमची गरज पाहता योग्य तो प्लान निवडू शकता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *