‘पार्ट्यांमध्ये कोकेन, MD ड्रग्स.., मी स्वतः सगळे ड्रग्ज घेतलेत ‘ पक पक पकाक’ फेम अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाली ..


Marathi Actress Narayani Shastri: ‘पक पक पकाक ‘ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘साळू ‘ च्या भूमिकेसह अनेक हिंदी लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नारायण शास्त्री (Narayani Shastri) सध्या चर्चेत आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीच्या कलाकारांसह इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरणावरून सगळ्यांचीच पोलखोल केलीय. टीव्ही सेटवरील पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेणं किती सामान्य आहे, याविषयी तिने सांगितलं. तसेच अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आणि इंडस्ट्रीत स्त्रियांना वापरून घेण्याचे प्रमाण याच्यावरही ती रोखठोक बोलली आहे. ‘इंडस्ट्रीत पार्ट्यांमध्ये कुठले ड्रग्ज वापरले जातात, ते घेतल्यानंतर कसे शुटिंग रद्द केलं जातं अशा अनेक खुलाशांसह तिने स्वतः ड्रग्ज घेतल्याचंही कबूल केलं.

‘पार्ट्यांमधील ड्रग्जसाठीही असतं बजेट.. ‘

क्योंकी ‘सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’, ‘पिया का घर’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री इंद्रायणी शास्त्रीने काम केलं आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत, तिने अनेक खुलासे केले. ती म्हणाली ‘मनोरंजन विश्वात पार्ट्यांमधील दारूसाठी एक विशिष्ट बजेट असतं.पण त्याच सोबत आता तिथे बेकायदेशीर ड्रग्सही बजेट असतं, हे पाहून मला धक्काच बसलेला. म्हणूनच मी अनेक वर्षांपासून पार्ट्यांमध्ये जात नाही.कारण आता पार्ट्यांमध्ये डान्स किंवा मजामस्ती नसते, वेगळच घडत असतं. मोठ्या पार्ट्यांमध्ये इतक्या उघडपणे गोष्टी घडत नाहीत.मी ड्रग्स घेणाऱ्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही पण अनेकदा मी लोकांना ते करताना पाहिलं आहे.’ असं अभिनेत्री इंद्रायणी शास्त्री म्हणाली.

ती पुढे म्हणाली ‘ अशा पार्ट्यांमध्ये कोकेन, एमडी ड्रग्स सर्रास वापरले जातात.मी आयुष्यात सर्व काही करून पाहिलं आहे.पण त्याचा परिणाम काय होतो? ते कसं काम करत हे जाणून घेण्यासाठी.मी स्वतःला कधीच कशाचं व्यसन लागू दिलं नाही.प्रत्येक ड्रग मी एकदा घेऊन पाहिलं होतं.मी एकदा दारूही प्यायले होते.जर माझ्या पेयात कोणी काही मिसळलं तर त्याचे परिणाम काय होतात हे मला जाणून घ्यायचं होतं.’ असं तिने सांगितलं.

 

मालिकांच्या सेटवरही घेतात ड्रग्ज

कलाकार सेटवर सुद्धा ड्रग्स सेवन करतात का? असं विचारल्यावर तिने होकारार्थी उत्तर दिलं. ती म्हणाली ‘आम्हाला अनेकदा यामुळे शूटिंग रद्द करावा लागायचं.कारण कलाकार शूटिंगच्या स्थितीतच नसायचा.हे सर्व काय चाललंय असा विचार करत आम्ही चार चार तास वाट बघत बसायचो. ड्रग्ज घेतल्यानंतर  त्यांना नीट उभे ही राहता येणे शक्य नसतं. हे बऱ्याचदा घडायचं’ असं नारायणी म्हणाली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *