Maharashtra Weather Rain Updates: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात (Maharashtra Rain Updates Marathi News) पुन्हा जोरदार सक्रिय होणार आहे. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेकडील वाऱ्याचा वेग वाढल्याने समुद्रात उंच लाटा उसळत असून, जोरदार वारे वाहत आहेत. समुद्रात ताशी अंदाजे 40 ते 50 किमीच्या वेगाने वारे वाहू लागले. तसेच स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज मुंबईच्या उपनगरात किंचित हलका पाऊस (Mumbai Rain) पडला. मध्य मुंबईत दुपारी पावसाच्या सरी बरसल्या. पहाटे आणि दुपारी पावसाच्या किंचित सरी कोसळत असल्या, तरी हवामान बदलामुळे मुंबईकरांना घाम येण्याचे प्रमाण मात्र कमी झाले नव्हते. (Maharashtra Weather News)
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार- (Ambernath Badlapur Rain Updates)
उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसतोय. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे. सतत कोसळणाऱ्या सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडताना दिसून आली. या पावसामुळे वाहनचालक पादचारी आणि कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना रेनकोट आणि छत्रीचा आधार घ्यावा लागतोय.
गडचिरोलीत पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला- (Gadchiroli Rain News)
गेल्या वीस दिवसांपासून गायब असलेल्या वरूनराजाने शुक्रवारी गडचिरोलीसह जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी धान पर्ये आणि अवत्या करपण्याच्या मार्गावर असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर होते. सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला.
रायगडमध्ये भातशेती लावणीच्या कामांना वेग- (Raigad Rain News)
गेली आठ ते दहा दिवस दडी मारलेल्या पावसाने पकाही भागात एकदा बरसण्यास सुरुवात केल्यानंतर रायगडमध्ये भातशेती लावण्याच्या कामांना वेग आला आहे. मुळातच पाऊस उशीरा सुरु झाल्याने शेतकरी चिंतातुर होता त्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतीवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली होती. आठ दहा दिवसांनंतर पुन्हा दमदार पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतात लावणीच्या कामांना आता वेग आल्याचे रायगडमध्ये पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी- (Kolhapur Rain Updates)
आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी सुरू झाले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये पाऊस तुरळक असला तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र आज पासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळतं. सध्या उन्हाळ्याप्रमाणे पंचगंगा नदीची पाणी पातळी खाली गेलेली आहे. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा देखील अजूनही 50 टक्क्यांवरच आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मालेगावच्या जळकूमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस- (Nashik Malegaon Rain Updates)
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र असे असले तरी जोरदार झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला