Pravin Tarde On Mohan Joshi: ‘देऊळ बंद 2’च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे ‘ती’ धमकी अन्…; धमाल किस्सा ऐकलात?


Pravin Tarde on Mohan Joshi Deool Band 2: प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची झोकात कमाई केली. (Box Office Collection)या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि संपूर्ण ‘देऊळ बंद 2’च्या टीमच्या सक्सेस पार्टीची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. या ग्रँड पार्टीला मराठी मनोरंजन सृष्टीतील सगळ्या सेलिब्रेटींना आमंत्रण होतं.  चित्रपटादरम्यान घडलेले प्रसंग, किस्से यांची प्रविण तरडेंना काही कमी नाही. सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये त्यांनी अनेक किस्से सांगत धमाल उडवून दिली.  ‘देऊळ बंद 2’च्या सेटवर दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांचा स्वभाव सगळ्यांनाच अनुभवायला मिळायचा. सेटवर सगळ्यांवर चिडणाऱ्या प्रवीण तरडेंना शांत करण्यासाठी अभिनेते मोहन जोशी यांनी दिलेल्या धमकीनंतर प्रवीण तरडे यांना पुढे बोलताच यायचं नाही.  नुकत्याच झालेल्या सक्सेस पार्टीमध्ये प्रवीण तरडे यांनीच हा किस्सा सांगितलाय.

मोहन जोशींची ती धमकी, अन् प्रविण तरडेंची बोलतीच बंद

‘देऊळ बंद 2’च्या सेटवर कामात अडथळा आला, काही चूक झाली की दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची  कलाकार तंत्रज्ञांवर चिडचिड आदळआपट सुरु व्हायची. प्रसंगी शिव्याही द्यायचे. पाहून पाहून एकदा अभिनेते मोहन जोशी यांनी मजेशीर पण थेटच इशारा प्रवीण तरडेंना दिला. मोजोंनी अशी काही धमकी दिली की, प्रवीण तरडेंना पुढे काही बोलताच येईना. प्रवीण तरडे म्हणाले ‘मोजो पूर्वी डेंजर होते.आता जास्त डेंजर आहेत ते कसे मी सांगतो. स्वामींच्या भूमिकेसाठी त्यांना नाक आणि कान लावावे लागायचे. मी इकडे आरडाओरडा केला की तिकडे मोजो म्हणायचे ‘त्याला सांगा , त्याला सांगा नाहीतर नाक काढीन’ कारण नाक परत लावायला तीन तास लागायचे. ‘कान काढीन ‘ते पुन्हा लावायला लागायचं दीड तास. पूर्ण सिनेमात मी नाकाच्या आणि कानाच्या भीतीने त्यांच्यावर चिडलो नाही.धमकीच असायची. ते नाक जरा इकडे तिकडे झालं की, वाणी सरांना वाटायचं की मी खर्च वाढवला. पण तसं काही नाही याच्यात नाक आणि कानाचाही हात आहे’ असं प्रवीण तरडे म्हणाले. त्यावेळी उपस्थित सगळेच जण हसून लोटपोट झाले होते.

‘देऊळ बंद 2’ चित्रपट अजूनही भारतात आणि परदेशात आवर्जून पाहिला जातोय. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफुल आहेत. बॉक्स ऑफिसवर तसेच तंबू शो आणि गावागावात अगदी 10-20 रुपयांमध्ये हा चित्रपट दाखवल्यामुळे महाराष्ट्रभर या शोचा चाहतावर्ग तयार झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मुंबई,पुणे, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक शो या सिनेमाचे लागले होते. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक रुपयांचा विक्रम या चित्रपटाने केलाय. मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक चाललेल्या चित्रपटांपैकी क्रमांक एकवर असलेला हा चित्रपट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *