Video: ‘कपडे आमच्या समोर बदल…’, पापाराझींना मर्यादा ओलांडल्यानंतर भडकली झरीन खान, नेमकं झालं तरी काय? – Marathi News | Hamare samne kapade pehno bollywood actress zareen khan anger on paparazzi


Zareen Khan Video : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री झरीन खान हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईत पार पडलेल्या एका प्रोफेशनल इव्हेंट दरम्यानचा आहे. इव्हेंट दरम्यान एक पुरुष असं काही बोलून जातो, ज्यावर अभिनेत्री प्रचंड भडकते. झरीन त्या पुरुषाला स्पष्ट शब्दात सांगते की, ‘स्वतःच्या भाषेवर लक्ष दे’ आणि चेतावनी देते की, अशी वागणूक सहन करुन घेतली जाणार नाही. झरीन खान एका कपड्यांच्या ब्रँडच्या लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती, जिथे ती डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान करून पापाराझींसाठी पोझ देत होती. या कार्यक्रमादरम्यान, एका व्यक्तीने तिला सर्वांसमोर कपडे घालून दाखवण्यास सांगितलं.

पापाराझींवर भडकली झरीन खान

सर्वांसमोर कपडे बदल… असे शब्द समोर येताच झरीन खान प्रचंड भडकली. यावर संताप व्यक्त करत झरीन म्हणाली, ‘माझ्यासमोर असं काही केलं तर, मी खपवून घेणार नाही. मी अशी तशी नाही, तुम्ही जे बोलाल ते सर्वकाही सहन करेल. स्वतःच्या मर्यादेत राहा…’, यावेळी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.

सांगायचं झालं तर, झरीन खान ही पहिली अभिनेत्री नाही जिने पापाराझींवर टीका केली आहे. याआधी देखील अनेकांनी पापाराझींवर निशाणा साधला आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री नेहा धुपिया हिने देखील पापाराझींवर संताप व्यक्त केलेला. ‘गोल्ड स्ट्रीमिंग अवॉर्ड्स’ पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या नेहा पापाराझींवर निशाणा साधत म्हणालेली, ‘अभिनेत्रींचे पाठीमागून फोटो आणि व्हिडीओ काढता आणि छापता, व्हायरल करता… ‘

अनेक सेलिब्रिटींनी पापाराझींवर व्यक्त केलाय

याबाबत त्या अभिनेत्री नेहा धुपिया म्हणते, “हे योग्य नाही. आम्ही बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आमच्या बॅगा किंवा पुस्तके उचलणे आणि आमच्या मागे-मागे फिरणे यांसारख्या गोष्टी करता—हे आता चालणार नाही. हे सर्व थांबवा. आम्ही तुमच्याशी अत्यंत आदराने वागतो, त्यामुळे कृपया असे करू नका. मुळीच असे करू नका.

फक्त नेहाच नाही तर, सुपरस्टार सलमान खान देखील काही दिवसांपूर्वी पापाराझींवर संतापला होता. त्यानंतर, आपली अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील एका कॅमेरामनला खडे बोल सुनावले होते. एवढंच नाही तर, अभिनेत्री जया बच्चन देखील पापाराझी कल्चरच्या विरोधात आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *