मुलाची ओळख दाखवत सेवानिवृत्त शिक्षकाला दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुबाडलं, धक्कादायक घटनेनं खळबळ


ahilya nagar crime: सध्या मिरजगावमधील या चोरीच्या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

rob retired teacher returning from worshipping god
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मिरजगाव : दिवसाढवळ्या सेवानिवृत्त शिक्षकाला फसवून निर्जनस्थळी नेत चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८) सकाळी घडली. सीना कालव्याजवळील बावडकर पट्टी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मोटारसायकलवर बसवले अन्…

शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत कोरडे यांचे वडील मारुती बाबूराव कोरडे (वय ७८) हे नेहमीप्रमाणे सकाळी देवदर्शन आटोपून घराकडे परतत होते. त्याचवेळी क्रांती चौकात मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी दोघांनी आमच्या शोरूमचं उद्घाटन आहे, डॉक्टरांनाही सांगितलंय चला दाखवतो, असे सांगत त्यांना मोटारसायकलवर बसवले.
Maharashtra Timesलेकीवर अत्याचार होत असल्याचा संशय; बापानं तरुणाला संपवलं, कालव्यात फेकलं, गावकऱ्यांमुळे पोलीस पेचात

अंगठी दुकानदाराला दाखवून येतो म्हणून आरोपी पसार

कोरडे यांना मुलाच्या ओळखीचे वाटल्याने त्यांनी विश्वास ठेवला. मात्र दोघांनी त्यांना बावडकर पट्टी परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तिथे एका चोरट्याने अंगठी कुठे बनवली अशी विचारणा करून ती दाखवण्याचा बहाणा केला. दुकानदाराला दाखवून येतो असे सांगून चोरटे अंगठीसह पसार झाले. बराच वेळानंतर चोरट्यांचा डाव लक्षात येताच कोरडे यांनी थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुत्रा वाचविण्याच्या प्रयत्नात फोर व्हीलरचा अपघात; तरुण चालकाचा मृत्यू

सांगली : मिरज-सांगली रोडवर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुण चालकाचा मृत्यू झाला असून, वाहनातील सहप्रवासी जखमी झाला आहे. हा अपघात मध्यरात्री सुमारे दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास घडला. मृत तरुणाचे नाव विश्वजीत दिलीप नाईक (वय 21, रा. डी-मार्ट पाठीमागे, सांगली) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी चालवताना रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकाच्या लोखंडी अँगलवर जाऊन आदळली.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

या धडकेमुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पाहणी केली असून पुढील तपास हवालदार एस. एम. गायकवाड करत आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा