OTT Suspense Thriller: OTT वरचा जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर; डोकं चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स , खरा खलनायक ओळखणं कठीण


OTT suspense Thriller: OTT वर क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर (suspense thriller)पाहणाऱ्यांना सध्या मनोरंजनाची पर्वणी आहे. सध्या सस्पेन्स थ्रिलर जॉनरमध्ये एक दमदार चित्रपट चर्चेत आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट अखेरच्या काही मिनिटांत असा ट्विस्ट देतो की संपूर्ण कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. सिरीयल किलरवर आधारित अनेक चित्रपट आले असले तरी हा चित्रपट त्याच्या थरारक कथानकामुळे वेगळा ठरताना दिसतोय.

थिएटरमध्ये हिट, OTT वरही सुपरहिट

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव आहे ‘इलेव्हन’ (Eleven). नवीन चंद्रा, रेया हरी, अभिरामी, रवी वर्मा, दिलीपन, रियथविका, शशांक, आडुकलम नरेन आणि अरजई यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 16 मे रोजी प्रदर्शित झाला होता. मोठ्या स्टारकास्टचा टेकू नसतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपल्या बजेटइतकी कमाई करत यश मिळवलं. मात्र OTT वर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली. अनेक दिवस हा चित्रपट ट्रेंडिंग यादीत कायम राहिला.(OTT crime Thriller)

‘इलेव्हन’ची कथा नेमकी काय?

चित्रपटाची कथा एका शहरात घडणाऱ्या सिरीयल किलिंगभोवती फिरते. शहरात आतापर्यंत सहा जणांची निर्घृण हत्या झालेली असते आणि या सर्व हत्यांचा संबंध एका शाळेशी असल्याचं समोर येतं.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एसीपी रंजीत कुमार यांच्याकडे सोपवला जातो. मात्र अपघातात ते गंभीर जखमी होऊन कोमात जातात. त्यानंतर तपासाची जबाबदारी एसीपी अरविंदन यांच्याकडे येते. अरविंदन या रहस्यमय हत्याकांडाचा तपास सुरू करतो आणि एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागतात. प्रत्येक टप्प्यावर कथेत नवे ट्विस्ट येत राहतात. त्यामुळे खरा गुन्हेगार कोण, याचा अंदाज बांधणं प्रेक्षकांसाठीही कठीण होतं. विशेष म्हणजे, चित्रपटाचा शेवटचा क्लायमॅक्स सर्वच गणितं बदलून टाकतो.

कुठे पाहता येणार ‘इलेव्हन’?

सुमारे 3 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर 7.4 रेटिंग मिळालं आहे. जर तुम्ही अजूनही हा थरारक क्राइम-सस्पेन्स चित्रपट पाहिला नसेल, तर तो जिओ हॉटस्टार वर उपलब्ध आहे. सस्पेन्स, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्ट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘इलेव्हन’ हा नक्कीच वन टाईम वॉच चित्रपट ठरू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *