Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., ‘टॉक्सिक’चं ‘तबाही’ गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम


Toxic Film yash and kiara Tabahi: साऊथ सुपरस्टार यशचा (South Superstar yash) आगामी सिनेमा ‘टॉक्सिक’ (Toxic) सिनेमाच्या टीझरने सोशल मीडियात धुमाकूळ घातला. या टीझरमधील  इंटिमेट सीन्समुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या टीझरमधून 4 (Tabahi) अभिनेत्रींची झलक पाहायला मिळाली. या सिनेमाच्या टीझरमधून यश आणि कियाराची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘टॉक्सिक’या सिनेमाचा पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘तबाही’ (Entertainment) असे गाण्याचे बोल असून, या गाण्यातील यश आणि कियाराच्या रोमँटिक अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.

यशच्या ‘टॉक्सिक’ सिनेमातील ‘तबाही’ गाण्याने लावली आग (Toxic Film yash and kiara Tabahi Song release)

‘टॉक्सिक’ सिनेमातील ‘तबाही’ गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे  गाणं हिंदी, तेलुगु आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. युट्युबवर हे गाणं रिलीज होताच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.  हे गाणं यूट्यूबर  रिलीज होताच नेटकऱ्यांनी या गाण्याचे कौतुक केलं आहे.  ‘तबाही’ या गाण्यात यश आणि कियाराच्या केमिस्ट्रीने आग लावली आहे, असं काही नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

 

‘तबाही’ या गाण्यात यशचा रफ अँड टफ लूक पाहायला मिळत आहे.  तर, कियाराही हटके अंदाजात दिसत आहे. कियारा आडवाणीच्या ग्लॅमरस लूकने या गाण्याला चारचांद लावले आहेत.  संपूर्ण गाण्यात कियारा आणि यश एकमेकांच्या प्रेमात बुडाले असल्याचं दिसत आहे. कधी  समुद्र किनारी तर कधी भरपावसात रोमान्स करत असल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण गाण्यात दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून जात असल्याचं दिसत आहे. चाहत्यांनी देखील या कपलला सर्वात हॉट ऑनस्क्रिन कपल असं म्हटलं आहे.

टीझर असो किंवा गाण्यात, कियारा या सिनेमात खूप आकर्षक दिसत आहे.  हे गाणं विशाल मिश्रा याने गायले असून,  कमेंट सेक्शनमध्येही या गाण्याच्या गायकाचे कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरमधून 4 अभिनेत्रींची झलक  दाखवण्यात आली. कियारा आडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत या 4 सुंदर अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?’ प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले ‘अशा वृत्तीच्या लोकांना…’





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *