Ajinkya Rahane on Sanju Samson : ज्याने वर्ल्ड कप जिंकवला, त्याच संजूला संघातूनच काढलं! अजिंक्य रहाणेची ‘ती’ स्टोरी अन् निवड समितीवर थेट निशाणा, नेमकं काय म्हणाला?


Sanju Samson dropped from India’s T20I squad for Zimbabwe : झिम्बाब्वेविरुद्ध 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 6 जुलै 2026 रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, या संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचे नाव नसल्याने क्रिकेट जगतात प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर एका मोठ्या वादाला तोंड फुटले असून अनेक दिग्गज आणि चाहते संजूच्या समर्थनात पुढे आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने देखील इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत संजू सॅमसनला पाठिंबा दिला आहे आणि निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अजिंक्य रहाणेची इन्स्टाग्राम स्टोरी (Ajinkya Rahane on Sanju Samson)

अजिंक्य रहाणेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये संजूला संघातून वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. टी-20 वर्ल्ड कप विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूला झिम्बाब्वेसारख्या दौऱ्यातून बाहेर ठेवणे अनाकलनीय असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अजिंक्य रहाणेने लिहिले की, “मी आशा करतो की संजू सॅमसनसोबत याविषयी सविस्तर चर्चा झाली असेल. टी-20 वर्ल्ड कपच्या जेतेपदाचा हिरो झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 संघात नाही, याचे मोठे आश्चर्य वाटतेय. मला आशा आहे की त्याला लवकरच पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळेल.”

संजूच्या जागी प्रभसिमरन सिंगला संधी (Ajinkya Rahane on Sanju Samson)

निवड समितीने या दौऱ्यासाठी संजू सॅमसनऐवजी प्रभसिमरन सिंग याला यष्टीरक्षकाचा दुसरा पर्याय म्हणून संघात स्थान दिले आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड मालिकेदरम्यान दुसऱ्या टी-20 सामन्यातही संजूला प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर ठेवण्यात आले होते, ज्यावरून आधीच बरेच वाद झाले होते. संजू सॅमसनला संघातून वगळण्यामागे त्याचे अलीकडचे खराब फॉर्म हे मुख्य कारण मानले जात आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये संजूने निराशा केली होती.

आयर्लंडविरुद्धच्या एका सामन्यात त्याने फक्त 5 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तो ‘गोल्डन डक’वर आऊट ठरला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही त्याला फॉर्म गवसला नाही आणि तो 7 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. या सलग खराब कामगिरीमुळेच त्याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून डच्चू देण्यात आला आणि त्याच्या जागी तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली. आता चालू असलेल्या इंग्लंड मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमध्ये संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा संधी मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG 3rd T20I Weather Update : तिसऱ्या टी-20 वर पावसाचं सावट की टीम इंडियाचा पलटवार? नॉटिंगहॅममधून आलं सर्वात मोठं अपडेट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *