Dombivli : शिवसेना नगरसेवकाचा रुग्णालयात धुडगूस, सहकाऱ्यांसह डॉक्टरांना केली मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद


Dombivli News : डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. ‘माझा फोन का उचलला नाही?’ या क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आपल्या प्रभागातील गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्याने रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली. तर एका महिला डॉक्टरला देखील धक्काबुक्की करत अरेरावी आणि दमदाटी केली. रुग्णालयातील हा सर्व थरार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टर आणि महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. माझा फोन का उचलला नाही? या शुल्लक कारणावरुन नगरसेवकाने मारहाण केली आहे. रमेश म्हात्रे असं या नगरसेवकाचं नाव आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत मारहाण करत असल्याचे त्यांचे CCTV फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये महिला डॉक्टर फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून खाली पाडल्याचेही दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कठोर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, या घटनेमुळं संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरसेवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मारहाणीत सहभाग असल्याचे CCTV फुटेजमधून समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आता नगरसेवकाने डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना नेमकी का मारहाण केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु आता या प्रकरणी काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *