Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप


Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) रमाई आवास योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. योजनेत बोगस कागदपत्रे देऊन आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील हा विषय मांडला होता. या योजनेत भाजपच्या नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी आहे. तर नगरसेविकेच्या पतीची वेगवेगळ्या बँकेत 33 खाती असून यात करोडो रुपये असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.

दरम्यान, घरकुल योजनेचा त्यांनी लाभ (Chhatrapati Sambhajinagar News) घेतला आहे ज्या एजएनसीला काम देण्यात आलं. एका शैक्षणिक संस्थेला काम दिल आहे. यांनी हाताने लिहून योजनेत नावे घुसवली आहेत. देवगिरी पतसंस्था आणि एक फायनान्स संस्था आहे तिच्या नावावर यांनी बिले काढली आहेत. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावे टॅक्स पावती आणि रेशनिंग कार्ड देखील आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पत्ता असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.

Ambadas Danve: एकनाथ शिंदे यांच्या नावाने रेशनिंग कार्ड, अन् जातीच प्रमाणपत्र; अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप

संभाजीनगर मधील 1985 रुपये टैक्स थकबाकी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाने देखील रेशनिंग कार्ड आहे. यावर एकनाथ शिंदे त्यांची पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांचं देखील नाव आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावे जातीच प्रमाणपत्र देखील आहे. सोबतच एससी प्रमाणपत्र देखील असल्याची माहिती विधान परिषदेत देत अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *