Shravan 2026: श्रावण महिना…भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना.. हिंदू धर्मात या महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा दिवस भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष समर्पित असून, देशभरातील शिवमंदिरांमध्ये या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा, अभिषेक आणि व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार, श्रावणातला पहिला सोमवार हा अत्यंत शुभ मानला जातोय. या दिवशी काही दुर्मिळ संयोग जुळून येतायत..ज्यामुळे 5 राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. जाणून घ्या भाग्यशाली राशींबद्दल…
श्रावणातला पहिलाच सोमवार अत्यंत पॉवरफुल, शुभ योग बनतायत…(Shravan 2026)
वैदिक पंचांगानुसार, श्रावण महिना हा लवकरच सुरू होत आहे, या महिन्यातील पहिला सोमवार, 17 ऑगस्ट 2026 या दिवशी येत आहे. हा दिवस भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यतांनुसार या दिवशी ग्रहांच्या संयोगांमुळे काही शुभ योगांचा प्रभाव जाणवू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिवपूजा, जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि ‘ॐ नमः शिवाय’ मंत्रजप केल्याने शुभ फळ मिळते. ज्योतिषीय मान्यतांनुसार या दिवशी काही राशींना ग्रहस्थितीची अनुकूल साथ मिळण्याचे संकेत आहेत.
पहिल्या श्रावण सोमवारी जुळणारे प्रमुख शुभ योग
श्रावणी सोमवार योग – भगवान शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि ‘ॐ नमः शिवाय’ मंत्रजपाला विशेष महत्त्व असते.
शिवपूजेसाठी अनुकूल काळ – श्रावण महिना आणि सोमवार यांचा संयोग असल्याने धार्मिक विधी, व्रत आणि दानधर्मासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
चंद्राचा प्रभाव – सोमवार हा चंद्राशी संबंधित असल्याने मनःशांती, भावनिक स्थैर्य आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस अनुकूल मानला जातो.
सिद्धीप्राप्तीसाठी शुभ वेळ – नवीन संकल्प, धार्मिक कार्य, जप, तप आणि पूजा सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
5 राशींसाठी दिवस अत्यंत शुभ…
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणातला पहिला सोमवार हा वृषभ राशीसाठी करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे योग असून अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणातला पहिला सोमवार हा कर्क राशीसाठी भाग्याची साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. शिवपूजेमुळे मानसिक समाधान मिळेल, अशी श्रद्धा आहे.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणातला पहिला सोमवार हा सिंह राशीसाठी मान-सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल मानला जाऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणातला पहिला सोमवार हा वृश्चिक राशीसाठी महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरू शकतात. व्यवसायात लाभ आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणातला पहिला सोमवार हा मीन राशीसाठी धार्मिक कार्यात सहभाग वाढवणारा ठरेल. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसू शकतात. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
2026 च्या श्रावण महिन्यात किती सोमवार येतील?
2026 वर्षात श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार असतील. या काळात भाविक या सोमवारी उपवास करू शकतात आणि भगवान शिवाची विशेष प्रार्थना करू शकतात.
पहिला सोमवार: 17 ऑगस्ट
दुसरा सोमवार: 24 ऑगस्ट
तिसरा सोमवार: 31 ऑगस्ट
चौथा सोमवार: 7 सप्टेंबर
श्रावणी सोमवारी काय करावे?
ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे.
शिवलिंगावर जल, गंगाजल, दूध आणि पंचामृताने अभिषेक करावा.
बेलपत्र, धतूरा, पांढरी फुले आणि चंदन अर्पण करावे.
‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा.
शिवचालीसा, शिवमहिम्न स्तोत्र किंवा रुद्राध्यायाचे पठण करावे.
शक्य असल्यास उपवास करून सात्त्विक आहार घ्यावा.
गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे.
हेही वाचा :
Lord Shiv: सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)