भारतीय वंशाच्या जय मुंदडराने आयर्लंड क्रिकेट संघाकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या पदापर्णात जय मुंदडराने जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियाला चकीत केले होते. कारण या खेळाडूने दोन सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या गोलंदाजीच्या बळावर आयर्लंड संघाने टीम इंडियावर 0-2असा क्लिन स्विप विजय मिळवला होता. विशेष म्हणजे जयला दुसऱ्या सामन्यात त्याला सामनावीर आणि मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
आता टीम इंडिया विरूद्ध केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर युरोपियन टी20 प्रीमियर लीग (ETPL) च्या एका फ्रँचायझीने जय मुंदडावर पहिली बोली लावली आहे. या टी20 लीगमध्ये आतापर्यंत सहा संघांनी 36 खेळाडूंची निवड केली आहे.ज्यात आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समधील प्रत्येकी 12 खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक संघाने सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. या मालिकेत रॉटरडॅम डॉकर्सने जय मुंदडाच्या रूपात आपली पहिली निवड केली आहे.
भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन देखील या लीगचा एक भाग आहे. तो डब्लिन गार्डियन्सचा कर्णधार आणि मार्गदर्शक आहे. रॉटरडॅम डॉकर्सचे सह-मालक जॉटी ऱ्होड्स यांनी फ्रँचायझीमध्ये जय मुंद्राच्या समावेशाबद्दल एक विशेष विधान केले. ते म्हणाले, “ज्या प्रकारे जय मुंद्राने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्यानंतर त्याला आमच्या संघात सामील करून घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. तो एक उत्तम तरुण प्रतिभावान खेळाडू आहे. तो आमच्या संघात सामील झाल्याने आम्हाला आनंद आणि उत्साह वाटत आहे. मला वाटते की जय व्यतिरिक्त, आमच्याकडे आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्सचे इतरही अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. मला वाटते की आमच्या संघात उत्कृष्ट संतुलन आहे.”
ॲमस्टरडॅम फ्लेम्स: कर्टिस कॅम्पफर, काईल क्लाईन, टिम प्रिंगल, आर्यन दत्त, जॉर्डन नील, मॅक्स ओ’डॉड
आयरिश वुल्व्स: मॅथ्यू हम्फ्रीज, फ्रेड क्लासेन, टिम टेक्टर, पॉल स्टर्लिंग, जानुल्लाह इहसान, अलेक्झांद्र रॉय
डब्लिन गार्डियन्स: बेंजामिन कॅलिट्झ, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हॉलार्ड, क्रेग यंग, नोहा क्रॉस, ख्रिस ग्रीव्ह्स
एडिनबर्ग कॅसल रॉकर्स: गॅरेथ डेलानी, रॉस अडायर, जॅक जार्विस, चार्ली टिअर, सफ्यान शरीफ, फिनले मॅकक्रीथ
ग्लासगो कॉस्मिक्स: ब्रॅड करी, मॅथ्यू क्रॉस, पॉल व्हॅन मीकेरेन, मायकल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस मॅकब्राइड
रॉटरडॅम डॉकर्स: जय मुंद्रा, मायकल लेव्हिट, रायन क्लाईन, जॅस्पर डेव्हिडसन, विक्रमजीत सिंग, साकिब झुल्फिकार.